एक्स्प्लोर

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार, योगेश कदमांनी राजीनामा द्यावा, अनिल परबांची मागणी अन् राजकीय आरोपांच्या फैरी जोरात

Anil Parab Vs Yogesh Kadam : या प्रकरणी योगेश कदमांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केली. तर योग्य वेळी पुरावे देऊ असं योगेश कदमांनी म्हटलं आहे.

मुंबई : ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. अनिल परबांनी माजी मंत्री रामदास कदम यांची पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर नवी मुंबईतील एक बार असल्याचा आरोप केला. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्या होत्या, असंही त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं. या आरोपांवर कदम पितापुत्रांनी काय उत्तर दिलं? हे नेमकं प्रकरण काय आहे? हे पाहुयात,

मुंबईच्या कांदिवलीतला सावली बार... हा बार आहे राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे. पण याच बारमध्ये मे महिन्यात पोलिसांनी एक कारवाई केली. त्या कारवाईची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांनी विधान परिषदेत दिली. त्यानंतर रडारवर आले माजी मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम.

काय म्हणाले अनिल परब?

अनिल परब म्हणाले की, "कांदिवली येथे सावली बार आहे इथे पोलिसांनी रेड केली त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचारी पकडले. याठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या गृहराज्यमंत्री यांच्या मातोश्री आहेत."

अनिल परबांनी असे थेट आरोप करत सरकारला धारेवर धरलं. एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सबार मधे नाचवता?

या सगळ्या कारवाईनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा बार 31 मे पासून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, कदमांच्या बारवर जी धाड टाकण्यात आली त्यावेळच्या एफआयआरमध्ये काय काय होतं, तेही पाहा.

कदमांच्या बारवर धाड, एफआयआरमध्ये काय काय?

1. कांदिवलीत 'सावली बार' वर 30 मे 2025 रोजी धाड.२

2. सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने.

3. 30 मे च्या रात्री 10.50 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बार वर धाड.

4. धाडीवेळी बारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी.

5. काही बार बाला आणि ग्राहक अश्लील नृत्यात करत असल्याचे निदर्शनास.

6. छाप्यानंतर वेटर,कॅशियर आणि मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात

7. बारचा परवाना ज्योती रामदास कदमांच्या नावे असा मॅनेजरचा जबाब

8. धाडीनंतर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या सगळ्या प्रकरणासंदर्भात रामदास कदमांनी हा बार पत्नीच्याच नावे असल्याचं कबुल केलं. ते म्हणाले की, "सावली बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा. पण बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच. नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते. करारानुसार बारमध्ये काही झाल्यास चालवणाराच जबाबदार असतो. माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय करणे हा गुन्हा आहे कायअनिल परब अर्धवट ज्ञान असलेले वकील आहेत.

याप्रकरणी अनिल परबांनी गृहराज्यमंत्री असलेले रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर यामध्ये राजकारण केलं जात असून यासंबंधीचे पुरावे समोर आणू असं योगेश कदम म्हणाले.

या सगळ्या प्रकरणानंतर रामदास कदमांनी अब्रुनुकसानीच्या दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर योगेश कदमांनी वाशीमधल्या बारवर कारवाईचे आदेश दिल्यानं अनिल परबांनी सूडापोटी हे सगळे आरोप केल्याचा आरोप रामदास कदमांनी केला.

रामदास कदम म्हणाले की, आमची बदनामी करणारा हा दावा आहे. सगळी चुकीची माहिती विधीमंडळात दिली. धंदा, व्यवसाय करणं चुकीचं नाही, 30 वर्षांपासून आम्ही यात आहोत. योगेश कदमने वाशीच्या बारवर धाडी टाकल्या त्याचा बदला म्हणून हे केलं जातंय.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांपेक्षा संजय गायकवाडांचा राडा, संजय शिरसाटांचा व्हिडीओ, पडळकर-आव्हाड समर्थकांची फ्रीस्टाईल हाणामारी हे आणि असे अनेक मुद्दे गाजले. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांच्या समस्यांशी काडीमात्र संबंध नव्हता. त्यात अनिल परबांच्या आरोपांचीही भर पडली. त्यामुळे ही नेतेमंडळी वैयक्तिक उणीदुणी काढणं, आरोप-प्रत्यारोप करणं, पक्षांतर्गत संघर्ष मध्ये आणणं यासाठी किती वेळ खर्ची घालतात? आणि सभागृहात जनतेचे प्रश्न किती मांडतात? हा खरं तर संशोधनाचा विषय ठरावा.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
Nitish Kumar: अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rajan Patil Angar Nagar Panchayat : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी
Ujwala Thite Angar Nagarpanchayat :अर्ज फेटाळला,उज्ज्वला थिटेंचा राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठा डाव
Prakash Solanke : Dhananjay Munde चांगले वक्ते पण मी अजित पवारांची सभा मागितली
Angar Nagar Panchayat : उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? Umesh Patil Ujwala Thite EXCLUSIVE
Naxal Bhupati appeal : Hidma चा खात्मा, आम्ही हत्यार टाकलं, तुम्हीही टाका, भूपतीचं आवाहन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम; आता पुढील मंगळवारी सुनावणी
Nitish Kumar: अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
अखेर बिहारी सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; एनडीएचा फाॅर्म्युला नेमका कसा ठरला?
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी
'सही रे सही'! अवघ्या एका सहीने अनगरमध्ये बंदुकधारी पोलिस घेऊन अर्ज दाखल करायला आलेल्या उज्वला थिटेंचा अर्ज बाद; 'टेक्निक' वापरून सही गायब केली का? कोणी केला आरोप??
'सही रे सही'! अवघ्या एका सहीने अनगरमध्ये बंदुकधारी पोलिस घेऊन अर्ज दाखल करायला आलेल्या उज्वला थिटेंचा अर्ज बाद; 'टेक्निक' वापरून सही गायब केली का? कोणी केला आरोप??
Loha Municipal Council: मेव्हणे, मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे अन् बरंच काही! भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण नांदेडमध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
मेव्हणे, मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे अन् बरंच काही! भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण नांदेडमध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
साधू हत्याकांडात ज्या मुख्य आरोपीला भाजपने फाशीची मागणी केली त्याला भाजपत घेतला, या अचाट हिंदुत्वासाठी फडणवीस, चव्हाणांचा सत्कारच करायला हवा; 'सामना'तून हल्लाबोल
साधू हत्याकांडात ज्या मुख्य आरोपीला भाजपने फाशीची मागणी केली त्याला भाजपत घेतला, या अचाट हिंदुत्वासाठी फडणवीस, चव्हाणांचा सत्कारच करायला हवा; 'सामना'तून हल्लाबोल
Embed widget