Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज, बुधवारी होणार सुनावणी
आर्थिक गैरव्यवहाराच्या (Money laundering Case) आरोपाखाली अटकेची कारवाई झालेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh) यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.
![Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज, बुधवारी होणार सुनावणी Anil Deshmukh moves special court to seek default bail in Money laundering case Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज, बुधवारी होणार सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/bb072cc14696ab5f265c29213b2d1a72_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या (Money laundering Case) आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख सध्या आर्थर रोड (Arthur road jail) जेलमध्ये आहेत. 10 जानेवारीपर्यंत त्यांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देशमुख यांना 2 नोव्हेबर 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. परंतु, अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. परंतु, 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली.
अनिल देशमुखांवरील आरोप
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)