Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
Anil Deshmukh: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांना 2 नोव्हेबर रोजी अटक करण्यात आलीय.
![Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ Maharashtra: Anil Deshmukh's judicial custody further extended for 14 days Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/05/9b0d005761054b2cfd74e473b02cb0e9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Money Laundering Case: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळं अनिल देशमुख यांना 10 जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये (Arthur road jail) मुक्काम कारावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांना 2 नोव्हेबर रोजी अटक करण्यात आलीय.
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं पाच वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीनं त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळं राज्यात एकच खळबळ माजली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटकं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)