एक्स्प्लोर

शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे नाशिक, छ. संभाजीनगर येथे भाजपचे कट कारस्थान; अनिल देशमुखांचा घणाघात

Anil Deshmukh: शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे नाशिक, छ. संभाजीनगर येथे ज्या काही घटना झाल्या, त्या कट कारस्थान करून दंगली घडवण्याचे प्रयत्न आहे का? असा सवाल करत अनिल देशमुखांनी सरकारवर घणाघात केलाय.

Nagpur News नागपूर :  शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापूर्वीच एक वक्तव्य करून असे सांगितले होते की, सध्याचे जे महायुती, भाजपचे सरकार आहे ते एन निवडणुकीच्या तोंडावर केव्हाही दंगली घडवू शकतात. त्याचप्रमाणे राज्यात काल छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) , नाशिक  (Nashik) व अन्य ठिकाणी ज्या काही घटना झाल्या, त्या कट कारस्थान करून दंगली घडवण्याचे प्रयत्न आहे का? हा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्यात अशा घटना घडू नयेत, राज्यात सलोखा आणि एकसंघ राष्ट्र रहावे, ही गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या सगळं घटनांकडे सरकारने जातीने लक्ष दिलं पाहिजे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते.

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार- अनिल देशमुख

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्वेसर्वा शरद पवार हे आज विदर्भ आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना शरद पवार हे भेट देणार आहेत. सोबतच वर्ध्यातील माजी आमदार सुरेश  देशमुख यांची 75व्या वाढदिवसाच्या निमित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथे देखील ते हजार राहणार आहे. लोकसभा  निवडणुकीतील यशानंतर आमच्याकडे येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. कारण सर्वांना विश्वास आहे की राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार.

कालच आपण ऐकलं महाविकास आघाडीकडून कोण मुख्यमंत्री होणार याबाबत देखील एक मत झाले आहे. राज्यात मविआचे सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री बसेल हा विश्वास आम्हाला आहे. असे असताना राज्याचा मुख्यमंत्री कोण हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र बसून निर्णय घेतील. असेही अनिल देशमुख म्हणाले.

भाजप निवडणुकीला का घाबरतो?- अनिल देशमुख

निवडणूक आयोगाने काल विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. खऱ्या अर्थानं राज्यात देखील सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित होतं. मात्र, आम्हाला ही गोष्ट समजत नाही की भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यासाठी का घाबरतो? निवडणुका जमेल तितक्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करत आहे. भाजप सरकार नगरसेवकांचे निवडणूक घेण्यासाठी तयार नाही. आपल्याला मोठा पराभव येईल, या भीतीने भाजप सरकार निवडणुकीसाठी घाबरत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget