महाविकास आघाडी म्हणजे 'खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा'; अमृता फडणवीस यांचा टोमणा
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
नागपूर: महाविकास आघाडीवर अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे 'खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा' अशी स्थिती असल्याचं त्या म्हणाल्या. या आधीही त्यांनी अनेकदा राज्य सरकारवर टीका केली आहे.
अमृता फडणवीस महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाल्या की, महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे ती 'खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा' अशी आहे. हे बंद झालं पाहिजे. राज्यात प्रगतीचे राजकारण झालं पाहिजे. बाकी तुम्ही खाण्यात काही खा किंवा न खा, त्याने काही फरक पडत नाही.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचे राजकारण हवं आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा कुठेही सूड भावनेने कारवाई करत नाही. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हाच ते तपास करतात आणि निष्पक्ष पद्धतीनेच त्याचा तपास करतात. त्यामुळे आता आपण बोलून काही उपयोग नाही. या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर कळेलच.
गेल्या काही काळात राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपाय यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. त्यावरुन अमृता फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीसांनी या आधीही वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संबंधित बातम्या :
- अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांविरोधात गुन्हा
- Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पुरणपोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...