Nitesh Rane : नितेश राणे यांच्या विरोधात अचलपूरमध्ये गुन्हा दाखल; हिंदू जण आक्रोश सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवलं
Amravati News: आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी हिंदू जण आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Maharashtra Politics अमरावती : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात अमरावतीच्या (Amravati News) अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी काल(रविवारी) हिंदू जण आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धार्मिक भावना दुखवणे, कलम 196 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. इमरान खान असलंम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत आमदार नितेश राणे आणि सागर भैय्या बेग, कोपरगाव या दोघांवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात द्वेष निर्माण व्हावा, अशी वादग्रस्त वक्तव्य केलीय. अश्या वक्तव्याने अचलपूर परतवाडा शहरातील शांती भंग करण्याचं काम नितेश राणेंनी केलंय. तसेच हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये वाद वाढावा, अशी वक्तव्ये त्यांनी केलीय. असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नितेश राणे हिंदू जण आक्रोश सभेसाठी अमरावतीत
भाजप नेते नितेश राणे हे रविवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्याच्या अचलपूर-परतवाडा या ठिकाणी सकल हिंदू समाजाचा जण आक्रोश भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या या दौऱ्याला आधीपासूनच विरोधाची किनार असल्याचे बघायला मिळाले होते. मुस्लिम समुदायाने या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. प्रथम पोलीसांनी बाईक रॅली, सभेची परवानगी नाकारत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कलम 163 बी एन एस एस लागू केली होती. मात्र रॅलीचा मार्ग बदलला आणि जिल्हाधिकारी यांनी सकाळी काढलेला आदेश रात्री मागे घेतला. तसेच नितेश राणे यांच्या बाईक रॅली आणि सभेलाही पोलिसांनी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
अचलपूर येथेल सभेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले होते की, मी शेवटी आलो अचलपुरात. हे लक्षात ठेवा माझं नाव नितेश नारायण राणे आहे. काही लोक सांगत होते की नितेश राणे को आणे मत दो. मात्र हा आमचा हिंदू राष्ट्र आहे, पाकिस्तान नाही. कुठं गेले ते 15 मिनिटं वाले. सांगा त्या हैदराबादवाल्यांना आम्ही अचलपुरात आहे. कशाला पाहिजे 15 मिनिटं 5 मिनिटाचं काम आहे. एक ही बाल्कनीत पाहून नव्हते मला. कुटुंबांना बाहेरगावी पाठवलं असं मला समजलं. जो नियम सगळ्यांना लागतो तोच नियम आमच्या सर्वांना लागला पाहिजे. आमचा हिंदू जल्लोष करतो, तेव्हा तुम्हाला का मिरची लागते. अकोला, नागपूर प्रत्येक जिल्ह्यात गणपती मूर्त्यांची विटंबना करण्यात आली. जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो, अंगावर जातो, तेव्हा सांगतात की भाईचारा आहे. असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा