एक्स्प्लोर

Bacchu Kadu : 17 रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का? आमदार बच्चू कडूंची राणा दाम्पत्यवर सडकून टीका 

पंतप्रधान म्हणायचे अच्छे दिन आयेंगे. 17 रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर घनाघाती टीका केली आहे.

Amravati Lok Sabha Election 2024आम्ही कोणत्या नेत्याचे गुलाम होऊ शकतं नाही. मात्र, आम्ही कालही जनतेचे गुलाम होतो आणि पुढेही असू. पैसा असल्यामुळे एकाच घरातील नवरा बायकोला आमदार, खासदार होता येतं. घरात सत्ता, पैसा असल्यामुळे हे सगळं होतं. मात्र, म्हणून आम्ही काय केवळ मत द्यायचे कां? सर्वसामान्य गरिबांना केवळ मत मागण्यासाठी ठेवले आहे का? मोदीजी म्हणायचे अच्छे दिन आयेंगे. म्हणून 17 रुपयांची साडी वाटली म्हणजे अच्छे दिन आले का, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राणा दाम्पत्यावर परत एकदा घनाघाती टीका केली आहे.

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Election) मतदारसंघासाठी प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी अमरावती मध्ये प्रहरच्या वतीने जनआंदोलन नामांकन यात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी केली. 

कार्यकर्ता म्हणून कार्यक्रताच्या नेतृत्वात लढणार

आगामी निवडणूक ही एका कार्यकर्त्याची निवडणूक आहे. निवडणुकीत नम्र होऊन, मतदारांचे आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवावी लागते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न केल्या गेले. म्हणून आम्ही येणारी निवडणूक मनातून इच्छा नसताना देखील काहींना उत्तर देण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून लढणार आहे. येणाऱ्या निवडणुकींचे जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा हे चित्र स्पष्ट असेल की, या या देशात नेतागिरी, अर्थकारणातून राजकारण चालणार नाही. आगामी निवडणूक ही देशात सन्मान निर्माण करणारी आहे. तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्मितेची ही निवडणूक असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

आज अमरावती शहराची काय अवस्था करून ठेवली आहे. इकडे तुम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घेत आहात. मात्र फिनले मिलचा कामगार, शेतकरी हा शेतीच्या बांधावर आत्महत्या करत आहेत. या फिनले मिलसह केंद्राने 23 मिल बंद केल्या आहेत. त्यामुळे आज 23 हजार लोक रस्त्यावर आले आहेत. याबाबत टेक्स्टाईल मंत्री पियुष गोयल यांना जाब विचारला तर ते या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळेच आम्ही बोललो होतो की, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. अलीकडे जाती-धर्मावर बोलणारे अनेक टोळ्या सज्ज झाल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर बोलणारे शोधून सापडत नाही, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

...म्हणूनच हा बच्चू कडू अपक्ष आमदार

आज शेतात उभे पिक उखाडून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. कृषी संबंधित सर्व निर्णय केंद्रात होतात. कांद्याची निर्यात बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. मात्र या विषयावर एकही खासदार दिल्लीच्या तख्तापुढे बोलला नाही. आमदार-खासदार, कलेक्टरचे पगार वेळेवर होतात. मात्र सर्वसामान्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळत नाही. अशा मुद्द्यांवर बोललं तर तिकीटही  मिळणार नाही म्हणून अनेकांची वाचा गेली आहे. म्हणूनच हा बच्चू कडू अपक्ष आमदार असून प्रहार करण्यासाठी सज्ज झाला असल्यासही बच्चू कडू म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget