Amravati News : खोटे जात प्रमाणपत्र असणाऱ्याला घरी बसवणार; खासदार नवनीत राणा विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक
Amravati Lok Sabha 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यामान खासदार नवनीत राणा यांना विरोध होतं असतांना, आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी संघटना एकत्र येत खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात एक झाल्याचे बघायला मिळत आहे.
Amravati Lok Sabha 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Lok Sabha Constituency) महायुतीतूनच विद्यामान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना विरोध होत असताना आता अमरावती (Amravati) जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी संघटना एकत्र येत खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात एक झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकतेच खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या (BJP) चिन्हावर अमरावती लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत सुतोवाच केले असतांनाच, आंबेडकरी संघटनांनी आपला अजेंडा आखत संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावती मधून सुरुवात केली आहे.
आज अमरावतीतील एका हॉटेलमध्ये विविध आंबेडकरी संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवनीत राणा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर खोटे जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसवू, असा निर्धार देखील यावेळी करण्यात आलाय.
खोटे जात प्रमाणपत्र असणाऱ्याला घरी बसवणार!
अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर विद्यामान खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित का ठेवण्यात आलाय, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे जातप्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसवण्याचा निर्धार या बैठकीत आंबेडकरी नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांच्यासाठी अडचणीची ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काय म्हणाल्या खासदार नवनीत राणा?
एकीकडे खासदार नवनीत राणा यांनी आपण भाजपमधून निवडणूक लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य करत आपल्या भजाप प्रवेशाबाबत भाष्य केले आहे. यावेळी त्या बोलतांना म्हणाल्या की, अमरावतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे. अमरावतीच्या जनतेच्या विचाराने भविष्यात मी या मैदानात भाजपच्या चिन्हावर लढणार आहे. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच. त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये. असे म्हणत नवनीत राणा यांचे कमळ चिन्ह घेण्याबाबत सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की, कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील. जो ही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील त्याच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. आज आम्ही एनडीए मध्ये आहे. जी माहिती केंद्रातून आली आहे आणि त्यावरून आमची चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली आहे. आम्ही जो निर्णय घेऊ त्या निर्णयाच्या मागे देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील. असा विश्वास देखील खासदार नवनीत राणा यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या