Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर यामुळे घडू शकतात मोठे अपघात, वाहन तज्ज्ञांकडून भिती व्यक्त
Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Highway) राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतर तसेच प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे (Hindu Hrudaysamarat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. एकीकडे या महामार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असला तरी, दुसरीकडे वाहन तज्ज्ञांनी या महामार्गाबाबत भिती व्यक्त केली आहे. तसेच या सुपर एक्स्प्रेसवरून प्रवास सुरु होण्याआधीच वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असेही तज्ज्ञांकडून सुचवले जात आहे. तर, या महामार्गाबाबत तज्ज्ञांचे नेमके मत काय? हे जाणून घेणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कदाचित मार्च महिन्यापर्यंत समृध्दी महामार्ग काहीअंशी सुरू होण्याची शक्यता आहे. कॉम्प्रेड रिजिड सिमेंट पेव्हर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा महामार्ग बनविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर - मुंबई दरम्यान 701 किमीच्या या मार्गावर कुठेही गतिरोधक नाही. या महामार्गाची वेग मर्यादा तासी 150 किमी जरी असली तरी, या माहामार्गाची वेगमर्यादा 180 किमी प्रति तास बनविण्यात आली आहे. हे देखील वाचा- Samruddhi Highway ची पहिली झलक 'माझा'वर, Nagpur - Shirdi समृद्धी महामार्ग लवकरच खुला होणार
तज्ज्ञांना नेमकी कोणती भिती वाटते?
- सरळ रेषेत असलेल्या समृद्धी महामार्गावर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावणार आहेत.
- सिमेंट काँक्रीटच्या या रिजिड मार्गावर वाहन घसरू नये म्हणून आडव्या बारीक रेषा तयार करण्यात आल्या आहेत.
- वाहन सुसाट वेगात असल्याने टायर आणि सिमेंट रोडच घर्षण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे टायरमधील हवेचा दाब वाढवून फुटण्याची शक्यता आहे.
- वाहनांच्या अतिवेगाने टायर फुटून मोठे अपघात होऊ शकतात व मोठी जीवित हानी होऊ शकते.
- वाहन चालकांना सरळ रेषेत मार्ग असल्याने वाहन चालविताना झोप येऊ शकते.
यावर उपाय काय?
- महामार्ग सुरू करण्याच्या सहा महिने आधीपासूनच विविध माध्यमातून जनजागृती करणे.
- वाहनांचे टायर जुने किंवा रिमोल्ड केलेले नसावे.
- वाहनांच्या टायरमधील दाब किती असावा, याची वेळोवेळी तपासणी करावी.
- महामार्गावरून वापरात येणाऱ्या वाहनाचा फिटनेस तपासण्यात यावा.
- वाहनचालकांची शारीरिक, मानसिक स्थिती महत्वाची असणे गरजेचे आहे.
- नशेत वाहन चालवणे टाळावे.
Samruddhi Mahamarg | 'बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' 1 मे 2022 ला खुला होणार : राधेश्याम मोपलवार
राज्यात मोठा गाजावाजा झालेला मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे. एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्यानंतर नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात.