(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray in INDIA alliance rally in Mumbai : अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा; उद्धव ठाकरेंचा शिवतीर्थावरून हुंकार!
मुंबईमध्ये इंडिया आघाडीची आज भव्य सभा पार पडली. या सभेतून इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. यावेळी इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांनी भाजपचा पाडाव करा, असे आवाहन केले.
Uddhav Thackeray in INDIA alliance rally in Mumbai : भाजपला देशाची घटना बदलण्यासाठी चारशेचा पारचा नारा दिला आहे. चारशे पार म्हणायला ते काय फर्निचरचं दुकान आहे का? यावेळी मी तर म्हणतो अब की बार भाजप तडीपार करून हुकूमशाहीचा अंत करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईमध्ये इंडिया आघाडीची आज भव्य सभा पार पडली. या सभेतून इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. यावेळी इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांनी भाजपचा पाडाव करा, असे आवाहन केले.
या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं
उद्धव ठाकरे सभेला संबोधित करताना म्हणाले की, महात्मा गांधीजींनी 1942 साली इंग्रजांना चले जावं सांगितलं होतं आज जी काय हुकूमशाही दिल्लीमध्ये आपल्याला लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे तिला तडीपार करण्यासाठी आपण (राहुल गांधी) शिवाजी पार्क निवडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेले. त्यांची स्वप्न आम्हाला सुद्धा विचारतात तेव्हा तुमच्या किती सीट येतील तेव्हा विचारलं तेव्हा चारशे पार म्हणता ते काय फर्निचर दुकान आहे का?
आम्ही विरोधी आहोत ते हुकूमशहाविरुद्ध
ते पुढे म्हणाले की, आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्त्वाचे नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रमध्ये तसं नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे. ज्या वेळेला मला आठवते की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं ते विरोधी पक्षांची बैठक आहे आम्ही विरोधी आहोत जरूर आहोत, पण आम्ही विरोधी आहोत ते हुकूमशहाविरुद्ध आहोत. तेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमच्या घरांना मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही, पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढा तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे? अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि ज्या संविधानाबद्दल शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टामध्ये ज्यावेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखाद्या काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतो ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे त्यावर हात ठेवून शपथ घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या