एक्स्प्लोर

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली, राजकीय पक्ष आक्रमक

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली सुरु होणार आहे. सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर टोल सुरु करायला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोकणातील दोन टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात करण्याची अधिकृत तारीख निश्चित केली आहे. कणकवलीमधील ओसरगाव टोल नाक्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधल्या हातीवलेमध्येही उद्यापासून (1 जून) टोल वसुली सुरु होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाने ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटकांना टोलवसुलीचा फटका बसणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबी करता एम डी करीमुन्नीसा या टोल ठेकेदार कंपनीमार्फत उद्यापासून टोलवसुली सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी देखील सुरु आहे.

ओसरगाव नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. दुचाकी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचं बहुतांशी काम पूर्ण झालं आहे. पण सर्व्हिस रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी महामार्गावर ठेवण्यात आलेले शॉर्ट कट मात्र जीवघेणे ठरत आहेत. गेल्या दोन दिवसात तीन ते चार ठिकाणी महामार्गावरील शॉर्ट कटने अपघात झाले.   

राजकीय पक्ष आक्रमक
उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका सुरु झाल्यास वादावादी होण्याची शक्यता जास्त आहे. सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सिंधुदुर्गवासियांकडून टोल वसुली केल्यास टोलनाका उद्ध्वस्त करुन टाकू, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनसेने सिंधुदुर्गातील वाहनांकडून जबरदस्तीने टोल वसुली केल्यास टोलनाक्याची तोडफोड करणार असं म्हटलं आहे. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लोकांची नुकसान भरपाई द्या, महामार्गावरील समस्या सोडवा आणि मगच टोल वसुली करा अशी सावध भूमिका घेतली आहे. याशिवाय सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोलवसुली करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पो चालक मालकांचा ओसरगाव टोल नाक्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावर उद्या वातावरण तापण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष टोल विरोधात असल्याने उद्यापासून सुरु होणाऱ्या टोल वसूली वर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Embed widget