एक्स्प्लोर

तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण कसे मिळाले? सरकारने लॉजिक सांगितलं, म्हणाले ते तर सामान्यीकृत गुण!

Talathi Bharti Exam :  तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फैरी झडल्या.

Talathi Bharti Exam :  तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फैरी झडल्या. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत टीकास्त्रं सोडलं. आता महाराष्ट्र सरकारकडून यावर खुलासा देण्यात आलाय. विद्यार्थाला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. 

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 200 पेक्षा अधिकचे गुण काही उमेदवारांना मिळाल्याचं समोर आले होते. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे. भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचे आरोप रविवारी केले. याबाबत सर्वच माध्यमात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत,काही आमदार,काही मंत्र्यांनी सुद्धा हा गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.प्रत्यक्षात असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे,असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले ?

सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

राज्य सरकारनं काय म्हटलेय ?

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 

सदर गुण सामान्यीकरण पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 05/01/2024 रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण (normalised score) www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले. दिनांक 07/01/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे. सदर 'गुण सामान्यीकरण' www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्त पत्र/दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्य करण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget