धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule : मी जर काही चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या असं खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.
मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक झाल्या आहेत.
एकीकडे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन घमासान सुरू आहे. आज मुख्यमंत्र्यांनीही यावरुन भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर भाजपचे काही नेते या संस्थांच्या धाडीच्या आधीच त्याची माहिती सोशल मीडियावरून कशी काय देतात? यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा."
8. Finally on ED, CBI - Questioned the independence of these bodies because the people on twitter know about the raids and on whom the raids will be done many days before the actual raid.
— Supriya Sule (@supriya_sule) March 25, 2022
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. त्यामध्ये कारवाई होऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री आता तुरुंगात आहेत. नुकतंच ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची 6.45 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या :
- ईडीने फुटबॉलचा खेळ सुरू केलाय.., आता हाफ टाईम झाल्यानंतर बघुयात काय होतंय ते; मामावरील कारवाईनंतर भाच्याची प्रतिक्रिया
- Pratap Sarnaik on ED Enquiry : ईडी कारवाईविरोधात न्यायालयात अपील करणार : प्रताप सरनाईक
- Maharashtra Budget Session : कुटुंबियांना का त्रास देताय? जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान