ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतनवाढ, 28 टक्के महागाई भत्ता आणि 10 तारखेला पगार; राज्य सरकारचे परिपत्रक जारी
ST Strike : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून वेतनवाढीचा आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या संबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे देण्यात आले असून मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतनवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच दर महिन्याच्या 10 तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. त्यानंतर राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन वाढीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन सरकार आणि एसटी महामंडळाने केले होते. शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली होती.
एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसं असेल? जाणून घ्या
1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.
2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.
3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टात असून एसटी कर्मचाऱ्यांनी कामगारांनी कामावर रुजू व्हावं. पगार वाढ केल्यांतरही काही कर्मचारी संप करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नाही. पैसे देऊनही संप चालू राहणार असल्यास काही अर्थ राहणार नाही.
संबंधित बातम्या :
- कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : अनिल परब
- ST Strike : पैसे देऊनही संप सुरु राहत असेल तर पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करणार; अनिल परबांचा इशारा
- ST strike Updates : 11 हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
