Gunratna Sadavarte : आज कोर्टात काय घडलं? अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद जसाचा तसा
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आंदोलन केलं होतं. त्या प्रकरणी अॅड.सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: अॅड गुणरत्न सदावर्ते यांचा तुरुंगवास आणखी वाढला आहे. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसोबत पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये सच्चिदानंद पुरी याचा समावेश आहे. सच्चिदानंद पुरी हा शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख संशयित आहे.
सरकारी पक्षाची बाजू ही अॅड. प्रदीप घरत यांनी मांडली तर अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या वतीनं अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद खालीलप्रमाणे,
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद
सदावर्ते हे त्या दिवशी न्यायालयात होते, पण या हल्ल्याचे प्लॅनिंग हे आधीपासूनच झाले होते. सदावर्तेंच्या मेसेज मधून हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये नागपूरमधील एका व्यक्तीशी सदावर्तेंचं बोलणं झालं होतं. या मेसेमजमध्ये बारामतीच्या मिटींगमध्ये बोलण्यात आले होते. नागपूरला व्हॅट्सअॅप कॉल करण्यात आला. सकाळी 11.35 ला हा कॉल केला गेला. सोबतच दुसरा देखील एक कॉल केला गेला. दुपारी 1.38 वाजता ला नागपूरवरुन सांगितलं की पत्रकार पाठवा. हल्ल्याच्या दिवशीबद्ल हा संवाद होता. 12 एप्रिलला बारामतीला काही होईल हे भ्रमीत केलं गेलं. मात्र 8 तारखेचा प्लॅन ठरला होता. व्हिज्युअल्स माध्यमांना कळवलं गेलं 2.42 पर्यंत आरोपी कोर्टात होते हे ते सांगतायत. मात्र त्यांनी पूर्ण प्लान आखला होता आणि ते मुद्दाम मॅट कोर्टात त्यावेळी गेले होते.
या षडयंत्रात MJT न्यूज चॅनेलचा सहभाग होता. या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील, कृष्णात कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदाकिनी पवार आरोपीच्या घराच्या परिसरातील दिसलेत. सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली. गुणरत्न सदावर्तेंच्या घरातून सीसीटीव्ही फूटेज घेतले होते, ते तपासायचे बाकी आहेत असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटी 80 लाख रुपये जमा करण्यात आले. यूट्यूब पत्रकारही यामध्ये सामिल झाले होते. MJT न्यूज चॅनेलचे चंद्रकांत सुर्यवंशी नावाचे आरोपी फरार आहेत. नागपूरमधील त्या वक्तीच्या संभाषणाची माहिती दिली आहे, नाव जाहीर करता येणार नाही.
या हल्ल्यासोबत आर्थिक घोटाळाही झाला असल्याचा आरोप सरकारी वकीलांनी केला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद
शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यामागे कोणताही कट नव्हता. एसटी कर्मचाऱ्यांकडून कोणतेही पैसे घेतले गेले नाहीत, जे काही आहेत ते स्वत: या कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. शरद पवारांच्या घरासमोर जे काही आंदोलन झाले त्यामध्ये सदावर्तेंचा काही संबंध नसून हे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. या आंदोलनस्थळी कोणालाही दुखापत झाली नाही, मग हे षडयंत्र कसं? नागपूरमधील कोणत्याही व्यक्तीशी चर्चा झाल्याचा आरोप हा हवेतील आहे.
सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जातोय, पण तशी कोणीच तक्रार केली नाही.
शरद पवारांच्या घरी हे आंदोलक गेले होते कारण शरद पवारांनी हे सरकार बनवलं आहे असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी केला आहे.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
