CM Uddhav Thackeray : हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश
सध्या आपल्याल बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.

CM Uddhav Thackeray : कोरोनाचं संकंट, वादळं, पाऊस पूर ही सगळी संकंट येत होती. या संकटात आपण महाराष्ट्रासाठी झटत होतो. या धावपळीत आपल्याला भेटायला उशीर झाला आहे, पण आता आपण जोमानं उतरत आहोत. सध्या आपल्याल बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत.
विरोधकांची हवा पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत आहेत. यूपीमध्ये भाजपचे आधीपेक्षा आकडे कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवावं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या 12 आमदारांच्या फाईलवर अद्याप निर्णय नाही. हे लोकशाहीला न पटणारं आहे. आता आपण घराघरात जाणार आहोत, आपलं कामं लोकांना सांगा, आपण घेतलेलं निर्णय घराघरात पोहोचवा असे ठाकरे यावेळी म्हणाले.
ते मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते, भाजपला टोला
एक वेळ अशी होती की, ते मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते. आता ते आपल्याला बोलत आहेत. आपल्याला अनेक ॲाफर येत आहेत, पण आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आधाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. याआधी काही जणांनी घात केल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, येत्या 22 मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिवसेनेच्या 19 खासदारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. एका खासदारांच्या मदतीला 12 पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
