Sanjay Raut: ईडीचे एक नेटवर्क खंडणी गोळा करण्याच्या कामात, लवकरच ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा इशारा
ईडीच्या या खंडणी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.
मुंबई: ईडी म्हणजे भाजपसाठी एटीएम मशिन आहे, ईडीचे एक नेटवर्क देशातील खंडणी गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस आजपासून तपास सुरू करत असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि इन्कम टॅक्सच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, खासदार संजय राऊत म्हणाले की, "ईडीकडून 100 हून जास्त व्यावसायिकांना धमकावलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी वसुल केली जाते. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचे हे रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो पण त्याच्या कार्यालयात कोणताही कर्मचारी नाही, मग तो कोणती कंपनी चालवतो. ईडी हे भाजपसाठी एटीएम मशीनप्रमाणे काम करत आहे."
संजय राऊत म्हणाले की, "देशातील सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं हे रॅकेट मुबई आणि दिल्लीमध्ये बसून चालवलं जात आहे. ईडीचे एक नेटवर्क खंडणी गोळा काम करण्याच्या कामात व्यस्त असून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त बिल्डर्सकडून ईडीने वसुली केली आहे. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काम करतोय."
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, "2017 साली ईडीने 7 कंपन्यांची तपासणी सुरू केली. त्यानंतर या सात कंपन्यांच्याकडून नवलानीच्या खात्यात 25 कोटी रुपये जमा झाले. त्यानंतर 15 कोटी रुपये जमा झाले. नंतर अविनाश भोसले यांची चौकशी सुरू झाली. त्यावेळी नवलानीच्या खात्यात 15 कोटी रुपये जमा झाले. असेच ज्यांची ज्यांची चौकशी झाली त्यांच्यावतीने नवलानीच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत."
खासदार संजय राऊत म्हणाले की, "ईडीकडून 100 हून जास्त व्यावसायिकांना धमकावलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी वसुल केली जाते. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचे हे रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो पण त्याच्या कार्यालयात कोणताही कर्मचारी नाही, मग तो कोणती कंपनी चालवतो. ईडी हे भाजपसाठी एटीएम मशीनप्रमाणे काम करत आहे."
ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार
खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय स्टेटमेन्ट... ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार."
सबंधित बातम्या :
- Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल
- Sanjay Raut: आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा