संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात मला धमकावून 25 लाख रुपये घेतले : मोहित कंबोज
Shiv Sena vs BJP In Maharashtra : राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन शिवसेना आणि भाजपता वाद पेटला आहे.
Shiv Sena vs BJP In Maharashtra : राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन शिवसेना आणि भाजपता वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग आला. शिवसेनेने भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटवर मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओही जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ' 2014 साली सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांनी मला धमकावून पंचवीस लाख रुपये घेतले आहेत. ते अद्याप परत केले नाहीत. या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत, मी तक्रारही करत आहे. मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?'
संजय राऊत यांनी मला धमकावून 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. मुंबई पोलिस गुन्हा दाखल करणार का? असा सवालही आपल्या ट्विटमधून मोहित कंबोज यांनी उपस्थित केला आहे...
मोहित कंबोज यांचं ट्वीट
My Question to CP Sanjay Panday , Will u Register FIR Against Sanjay Raut , In 2014 He Had intimidate me in Samana Office And Asked 50 Lakhs And Taken 25 Lakhs From Cheque From Me , Which He Said He Will Return With Interest , But Till Now He Has Not Given ! @sanjayp_1 pic.twitter.com/SHdqWTpLJE
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 7, 2022