एक्स्प्लोर

मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!

राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यावर शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. मी राज्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे. या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या ' माझा महाकट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.

मी लोकांशी संवाद साधणार आहे

"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे.  कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. 

शरद पवार काय म्हणाले, पाहा व्हिडीओ ?

संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात

"मुळात संवाद ठेवायला पाहिजे. आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जिवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं," असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. 

सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर लक्ष देणं गरजेचं

"गंमत अशी आहे की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे," असी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

हेही वाचा : 

अजित पवारांना मोठा धक्का, आणखी एका आमदाराने साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
अटल सेतू आता थेट सातारा, सोलापूरला जोडणार, मुंबई-पुणे प्रवासाचा सव्वा तासांचा वेळ कमी होणार
Horoscope Today 19 September 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
अटल सेतू आता थेट सातारा, सोलापूरला जोडणार, मुंबई-पुणे प्रवासाचा सव्वा तासांचा वेळ कमी होणार
Horoscope Today 19 September 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
Embed widget