हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; संभाजीराजेंचा इशारा
Sambhaji Raje Chhatrapati : हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय.

मुंबई : हर हर महादेव चित्रपटाचा (Har Har Mahadev movie) वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी दिलाय. संभाजीराजे यांनी याबाबत झी स्टुडिओला एक पत्र लिहिले असून या पत्रातून त्यांनी थेट इशारा दिलाय.
"हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इशारा संभाजीराजे यांनी दिलाय.
हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. संभाजीराजे यांनी यापूर्वीच हर हर महादेव चित्रपटावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु, येत्या 18 डिसेंबर रोजी हा चित्रपट झी मराठी या वाहिनीवरून प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी झी स्टुडिओला इशारा दिलाय.
हर हर महादेव हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. अनेक इतिहास अभ्यासकांनी देखील या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर 'हर हर महादेव'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार' असा इशारा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी दिलाय. चित्रपटात अनेक व्यक्तींचं चारित्र्य हनन केल्याचाही वंशजांनी आरोप केलाय. संभाजीराजे यांनी देखील या चित्रपटावरून आक्रमक भूमीका घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती. एवढ्या घटना घडून देखील 18 डिसेंबर रोजी टीव्हीवर हा चित्रपट दाखविला जाणार असल्याचे झी स्टुडीओने म्हटले आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी झी स्टुडीओला इशारा दिलाय.
महत्वाच्या बातम्या
Jitendra Awhad Exclusive : शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल : जितेंद्र आव्हाड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
