मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता
Parbhani: परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे.
Parbhani: परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय मृत तरुणचे नाव आहे.कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की झाले काय?
परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले.या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जण अटकेत
परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या ५० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आयजी शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही उमाप यांनी स्पष्ट केले. SRPF शहरात बोलावण्यात आली आहे, संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचेही शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा:
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त