एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

जिभेला आवरा, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा... मनोज जरांगेचा इशारा

मराठ्यांवर डाव टाकून करू नका. तुमचे पाच सात लोक आहेत ते कायम मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. ही गोष्ट गंभीरपणे घ्या  नाही तर 24 डिसेंबरनंतर  परिणाम दिसतील, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.

लातूर समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे त्यांनी शांत राहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  हे आरक्षणाचा विषय मार्गी लावू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याबरोबरचे लोक आवरावे आणि दिलेला शब्द पाळावा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी दिला आहे.  गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळांमुळे फडणवीस अडचणीत आले आहे. 

मनोज जरांगे म्हणाले, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सजग राहावं असं सातत्याने सांगत आहे  मात्र छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर टीका करत आहेत. जातीय तेढ निर्माण करून काही मिळणार नाही. त्यांना ही माझी ही शेवटची विनंती आहे, जिभेला आवरा, गोरगरीब लोकांचे चांगले संबंध आहेत ते खराब करू नका. राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका.

गोड बोलायचे काम करायचे नाही हा फडणवीसांचा डाव : जरांगे

मंगलप्रसाद लोढांविषयी बोलताना जरांगे म्हणाले, मंगलप्रभात लोढा कोण आहेत?. मराठ्यांवर बोलण्याची यांना काय गरज पडली . हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. फडणवीस यांना लक्षात आले पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे, आपण सरकार चालवतो. राज्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यांच्या लोकांनी असे स्टेटमेंट केलं नाही पाहिजे. फडणवीसांनी जे शब्द दिले त्याचा आम्ही सन्मान केला. आरक्षण देतो, गुन्हे मागे घेतो, अटक करणार नाही म्हणाले,अटक केली, गुन्हे दाखल केले नेमकं तुमच्या मनात डाव काय आहे हे एकदा स्पष्ट करा. तुमचे हे लोक थांबवा, थांबवायचे नसतील तर आम्ही ओळखून घेतले आहे फडणवीस साहेब काय करायचे आहे. ही धमकी नाही . मराठा समाजाने तुम्हाला 106 आमदार दिले आहेत. त्याची परतफेड मराठ्यांवर डाव टाकून करू नका. तुमचे पाच सात लोक आहेत ते कायम मराठ्यांवर गरळ ओकत आहेत. ही गोष्ट गंभीरपणे घ्या  नाही तर 24 डिसेंबरनंतर  परिणाम दिसतील. तुम्ही या लोकांना आवरा, ठरल्याप्रमाणे सगळे करा. तुम्ही डाव टाकला आहे गोड बोलायचे काम करायचे नाही. मराठा जागृत झाला आहे पहिल्या सारखा तो राहिला नाही याचे भान ठेवून काम करावे. भुजबळांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करणार असाल तर याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. 

पडळकरांनी मराठ्यांबाबत बोलू नये : जरांगे

गोपीचंद पडळकर आणि भुजबळांविषयी मनोज जरांगे म्हणाले, गोपीचंद पडळकरांचा विषय म्हणजे ते सामाजिक चळवळीतील नेते आहेत. त्यांनी मराठ्यांबाबत काही वेगळे बोलू नये. आपण सामजिक चळवळीचे अंग असलेले नेते आहेत. एकनाथ शिंदे जे बोलले ते त्यांनी केले आहे. समिती काम करत आहे.नोंदी सापडत असून काम सुरू आहे . काही अधिकारी मुद्दाम विरोधात काम करत आहेत. त्यांना शिंदेंनी वरून कमी करावे . मराठ्यांना विश्वास आहे की शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देतील त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी नाही दिले तर 24 नंतर त्यांच्या विरोधात दंड थोपटण्यास आम्ही तयार आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Embed widget