सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही - मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला (maratha reservation, Manoj Jarange Patil) दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर आपलं मत व्यक्त केले. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. आमचंच आरक्षण आम्हाला द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, समाजासाठी आजचा निर्णय महत्वाचा आहे. आजची बैठक तुमचं ऐकून निर्णय घेण्यासाठी आहे. आमरण उपोषण करू नका म्हणून मनोज जरांगें यांच्याकडे आंदोलकांची आग्रही मागणी.
करोडो मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते. कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागलेत. जे रूसत होते, कुणबी नको म्हणून त्यांना काल कुणबी आरक्षण मिळाले, आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकतय? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या शिवाय सरकारला सुट्टी नाही. कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या तीन मागण्या -
1)मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून सर्व नोंदी सापडून सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी करा
2) अंतरवली सह ,राज्यातील सर्व केसेस विना अट मागे घ्यायच्या
3) हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि ते स्वीकारायचे. 1881 चे गॅझेट घ्या,1901 ची जनगणना घ्यावी,बॉम्बे गॅझेट घ्या.
पुढील आंदोलनाची दिशा ठरणार...
मनोज जरांगे यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत तीन प्रमुख मागण्यांवर एकमत झालं आहे. त्यामुळे काही वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन पुढील मागण्या मांडतील. तसेच, या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला काही वेळ दिला जाऊ शकतो. सोबतच, सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढील आंदोलन कसे असणार याबाबत सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
स्वतंत्र आरक्षणाची मागणी नाही...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला. मात्र, स्वतंत्र आरक्षण देण्याची मोजक्या शंभर दीडशे लोकांची मागणी असून, कोट्यवधी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहेत. त्यामुळे सरकराने सगेसोयरे अध्यादेशाप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे असेही जरांगे म्हणाले आहेत.