Manoj Jarange Patil: मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हावं लागेल, नेता हात जोडून समोर उभा राहील; नारायणगडावरून मनोज जरांगेंची भावनिक साद
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील म्हणाले की, मला जीवनात येऊन सिद्ध करायचं होतं ते केलं आहे. मी कधीही समाजासाठी खोटं बोललो नाही, नाटक केलं नाही. मात्र, काही वेळा एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे गेलो.

Manoj Jarange Patil: आमचं गॅझेट गुलामीचं मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून (Narayangad Dasara Melava) दसरा मेळाव्यातून केली. गुलामीचं गॅझेट म्हणून होणाऱ्या टीकेवरून मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल करताना गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करणार का? अशी विचारणा त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांना नारायणगडावरून भावनिक भाषण करताना अश्रु अनावर झाले. प्रशासनात सगळे बोगस लोक जाऊन बसल्याची टीका त्यांनी केली. मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हायचं, मराठा समाजाच्या लेकरांनी प्रशासनात दबदबा निर्माण केल्यास नेते हात जोडून उभा राहतील, असे ते म्हणाले. इथून कोणत्याच नेत्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, तर तो आणि त्याचे लाभार्थी म्हणायचं, असे त्यांनी आवाहन केले. मुठभर नेत्यांसाठी ओबीसी समाजाला आजपासून दोष द्यायचा नाही, असे ते म्हणाले. धनगर, माळी समाजाचा नेता बोलला म्हणजे समाज विरोधात नाही, असेही ते म्हणाले.
मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी (Manoj Jarange Patil on Farmer)
मनोज जरांगे पाटील म्हणाले, गड नगद आहे म्हणून ताकद मिळते, मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी. ते पुढे म्हणाले की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा असल्याचे सांगितले होते. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं पाहायचं आहे असल्याचे ते म्हणाले. तुम्ही दिलेल्या साथीमुळे 75 वर्षात न जिंकलेली लढाई जिंकली असून 58 लाख नोंदी सापडून 3 कोटी समाजात आरक्षणात गेला आहे. एका वर्षात सातारा हैदराबाद गॅझेट मिळवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
काही पांढरे कपडे घालून गाड्या घेऊ फिरले
जरांगे पाटील म्हणाले की, मला जीवनात येऊन सिद्ध करायचं होतं ते केलं आहे. मी कधीही समाजासाठी खोटं बोललो नाही, नाटक केलं नाही. मात्र, काही वेळा एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे गेलो. हे सांगताना मनोज जरांगे भावूक झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, मराठा समाजाची तडफड दिसत होती. त्यामुळे शेतीबरोबर आरक्षणाचा आधार गरजेचा वाटला. आपण हैदराबाद आणि सातारा गॅझेट मिळवून आरक्षण मिळवलं आहे. जीवनात मिळवायचं होतं ते मिळवलं आहे. काही पांढरे कपडे घालून गाड्या घेऊन फिरले, यातच मर्दानगी गाजवली असल्याचा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या























