एक्स्प्लोर

राजकीय पक्षाच्या त्रासाकडे लक्ष देऊ नका, सर्वांनी डाटा घेऊन 14 ते 20 ऑगस्टला अंतरवलीला या! मनोज जरांगे यांचे आवाहन

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सांगता आज नाशिकमध्ये झाली. या सांगता सभेतून मनोज जरांगेंनी छगन भुजबळांसह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Manoj Jarange Patil नाशिक :  राज्यात आणि केंद्रात मराठ्यांची शक्ती वाढवायची असेल तर आपली मुलं बाळ आपल्या डोळ्यापुढे ठेवली पाहिजेत.  त्यासाठी आरक्षण (Maratha Reservation) हेच मराठ्यांना मोठं करू शकतं, हे लक्षात ठेवा. राजकीय नेत्यांच्या नादाला लागून आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधकारात टाकू नका, सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून मराठ्यांना उघडं पाडण्याचा षडयंत्र रचलं आहे. असं होत असताना तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलताच कसे? मराठ्यांनी आता तरी भान ठेवा, 29 ऑगस्टला लढायचे ठरलं तर पूर्ण ताकतीने काम करा. राजकीय पक्षाच्या त्रासाकडे अजिबात लक्ष देऊ नका. पाडायचं असले तर पाडा, आणि निवडून द्यायचे तर निवडून द्या.

मात्र येत्या 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी आपला डाटा घेऊन आंतरवाली सराटीत एकत्र या, असे आवाहन मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रालीची सांगता आज नाशिक येथे होत आहे. या सभेतून  जरांगे पाटील यांनी  मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सरकारवर जोरदार निशाणा साधत  हल्लाबोल केला आहे. 

मराठा, ओबीसी समाजामध्ये कुठलाही वाद राहता कामा नये

राज्यात काही झालं तरी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कुठलाही वाद राहता कामा नये. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठीच आम्ही ही शांतता रॅली काढली आहे. मात्र, आपल्या आरक्षणाच्या लढाईत आपली एकजूट प्रस्थापित व्हावी, हा देखील या रॅलीचा हेतू आहे. मला आज प्रचंड त्रास होत असतानाही मी आज तुमच्यात उभा राहून समाजासाठी लढतो आहे. माझं दुसरं तिसरं काहीही उद्देश नाही.  आज एका प्रमाणपत्राच्या जोरावर कित्येक गोरगरीब मराठ्यांचे लेकरं नोकरी आणि शिक्षणात पुढे जात आहेत.

छगन भुजबळ सारखे नेते आडवे येत असतील तर त्यांनाही पाडा 

राज्यात देशात स्वतःच्या मुलाबाळांचं वाटोळ होत असताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी कसं काय बघू शकता? मला तुमचा नेता जवळचा आहे की तुमचे लेकरं? नेत्याला मोठं करून तुमची काय मान उंचावणार आहे? त्यामुळे मराठ्यांनी स्वतःची जात आणि आपले मुलं बाळ मोठा करण्यासाठी झुंज द्या. पक्ष आणि नेत्यांना पायदळी तुडवा आणि समाजाच्या हितासाठी एकत्र या. छगन भुजबळ सारखे नेते अक्षराच्या लढाईत आडवे येत असतील तर त्यांना देखील पाडून टाका, असे थेट आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. हल्लीचे युग स्पर्धात्मक युग आहे. तिथं तक धरून उभे राहायचं असेल तर जातीची लढाई लढली पाहिजे.

एकजुटीच्या जोरावर अनेकांनी आपला समाज मोठा केला आहे. उद्या माझं काय बरं वाईट होईल हे सांगता येतं नाही. सगळ्यांनी मलाच उघडं पाडायचे ठरवलं आहे. तर मी माझे स्वप्न घेऊन आज तुमच्यात उभा आहे. आज माझं शरीर मला साथ देत नसलं तरी तुमच्या ताकतीवर मी आज तुमच्यात उभा आहे.  माझ्या स्वप्नात कुठेही तडजोड नाही.  असेही मराठा आंदोलन म्हणून जरांगे म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP MajhaABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget