एक्स्प्लोर

School Reopen : नाशिक शहरातील शाळा 13 डिसेंबरपासून, शिक्षण विभागाचा निर्णय

Nashik School Reopen : नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळा आता येत्या सोमवारपासून म्हणजे 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळा आता येत्या सोमवारपासून म्हणजे 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 डिसेंबरपर्यंत नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटची स्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार आता अखेर 13 डिसेंबरपासून नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु होणार आहे. 

ग्रामीण भागात पहिलीपासून शाळा सुरु झाली असली तरी महत्वाच्या शहरांमधील पहिलीपासूनचे वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन उद्या किंवा 15 तारखेऐवजी शाळा नवीन वर्षातच सुरु करा, अशी मागणी शिक्षक-पालकांकडून केली जातेय. मुंबई, पुण्यासारख्या शहरात 15 डिसेंबरपासून तर नाशिकमधील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.  राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे  23 डिसेंबर ते 1 जानेवारी अशी नाताळची सुट्टी असते. त्यामुळे 15 तारखेला शाळा सुरु केल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी लागेल. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरु करण्याची मागणी शिक्षक आणि पालकांनी केली आहे. 

काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना?

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे
  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे
  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
  • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये
  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी
  • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे
  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
  • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे 
  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये
  • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
  • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी
  • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे
  • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
  • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
  • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

इतर महत्त्वाच्या बातम्या :

School : शाळांबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी; मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि 'या' नियमांचं पालन करावं लागणार

देशातील मुलींची पहिली शाळा पुन्हा गजबजणार; ऐतिहासिक भिडे वाड्यात वर्ग भरणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडेRatnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP MajhaCity 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Embed widget