एक्स्प्लोर

Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Rains Live Updates : राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत

Background

Maharashtra Rains Live Updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.   कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे. 

नाशिक पाऊस

जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक सह जिल्हाभरात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह मुंबई नाका, सीबीएस, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, गंगापूर रोड परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढील एका तासातच शहरात तब्बल 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

दरम्यान एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. तर शहर परिसरात म्हणजे नाशिक रोड, गिरणारे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिकसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

नागपूर विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी 360.10 मिलिमीटर पाऊस पडतो, यावर्षी प्रत्यक्षात 684.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

11:18 AM (IST)  •  05 Aug 2022

 उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य असलेलं तेरणा धरण भरलं, पाण्याचा प्रश्न मिटला

 उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य तेरणा धरण फुल भरले आहे. तेरणा धरण ओसंडून वाहत आहे. हे धरण भरल्याने तेरणा नदी व तेर गावातील नागरिकांना पुराचा इशारा दिला आहे. तेरणा धरण भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
11:10 AM (IST)  •  05 Aug 2022

बार्शीत मुसळधार पाऊस, बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावरील घोर ओढ्याला पूर

Barshi Rain : बार्शी शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास देखील बार्शीत मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. यामुळं बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावरील घोर ओढ्याला पूर आला आहे. ओढ्याच्या पुलावरुन जवळपास पाच फूट पाणी वाहत असल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बार्शीत मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळं सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. कालपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यात एकूण 400 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामुळं बार्शी तालुक्यातील नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत.

10:34 AM (IST)  •  05 Aug 2022

पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा,

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे.  सिंधुदुर्गात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याम पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री आंबोलीत ढगफुटी सदृश पाऊस सलग सहा तास कोसळला.

10:29 AM (IST)  •  05 Aug 2022

नांदेडमधील उमरी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, बेलदरा, हातनी रस्ता बंद; उंची कमी असलेल्या पुलाला पूर, शेकडो नागरिक अडकले .

Nanded Rains : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात आज ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. बेलदरा, हातनी, येंडाळा, महाटी, कौडगाव जाणाऱ्या अरुंद व उंची कमी असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक चार तास पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान काही नागरिकांनी नाहक धाडस दाखवत, पुराच्या पाण्यातून जोखमीचा प्रवास करत पुल ओलांडला. दरम्यान आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उमरी तालुक्यातील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. तर अरुंद रस्ते आणि पुलाची उंची कमी असल्याने चांगला पाऊस झाला की पुलावरुन पाणी वाहते आणि रस्ता बंद होतो. त्यातच आज झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे बेलदरा, हातनी या मार्गावरील पुलाला अचानक पूर आल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे अलीकडील आणि पलीकडच्या भागातील जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक, शेतकरी, शालेय विद्यार्थी अडकून पडले होते. पुलाला पूर आलेला असताना देखील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.

10:26 AM (IST)  •  05 Aug 2022

तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय, जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Sindhudurg Rains : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. सिंधुदुर्गात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याम पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री आंबोलीत ढगफुटी सदृश पाऊस सलग सहा तास कोसळला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ठाकरेंनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारले, म्हणाले....Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Embed widget