एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

NCP Jayant Patil On Ajit Pawar: जयंत पाटील यांचा अजित पवारांना मिश्किल टोला, दादांनी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाची...

NCP Jayant Patil: विरोधी पक्षनेते पद काढून संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला आहे.

NCP Jayant Patil On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्ष संघटनेत जबाबदारीची मागणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  अजित पवार यांनी मी किती महिने पूर्ण केले आहेत ते भाषणात सांगितलं आहे. 5 वर्ष 1 महिना मला प्रदेशाध्यक्षपदावर पूर्ण झाले असल्याचा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही रस नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या मी त्या पदाला न्याय देईल असे वक्तव्य केले. 

अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला असल्याचे म्हटले जात आहे. जयंत पाटील मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. प्रत्येकी 3 वर्षांनंतर पद बदलण्याची पक्षाच्या घटनेत तरतूद आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी मागितली असल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, अजित पवार यांनी मी किती महिने पूर्ण केले आहेत ते भाषणात सांगितलं आहे. 5 वर्ष 1 महिना मला प्रदेशाध्यक्षपदावर पूर्ण झाले असल्याचे त्यांनी मिश्किलपणे म्हटले. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष महोदय उल्लेख केला. दादांनी ‌विधानसभा काढली म्हणून हा शब्द आला असल्याचे म्हणत दादा खरंतर तुम्ही विधानभवनात जायला पाहिजे होते. सत्ताधारी किती वाकतात, कसे वागतात हे बघणं विरोधी पक्षनेत्याचं काम आहे असेही पाटील यांनी म्हटले. 

आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी  पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन करताना बुथ कमिटी आणखी बळकट करण्याची गरज असल्याचे म्हटले. नेत्यांची भाषणे दमदार होतील पण मैदानावर काम करायला लोक नसतील त्याठिकाणी पराभव होईल, असेही पाटील यांनी म्हटले. पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली आहे. मात्र भारतात पक्ष पोहचवण्यासाठी सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल चांगल काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

राज्य सरकारवर टीका 

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात  राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आज राज्यभरात दंगली घडत आहे. दंगलीचा पॅटर्न बघितला तर लक्षात येईल की जिथे भाजप शिंदे गटाची ताकद नाही तिथे या दंगली घडत असल्याचा दावा त्यांनी केला. मला सरकारमधील मंत्र्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा पण महाराष्ट्रात हा प्रकार थांबवा असे आवाहन त्यांनी केले. 

भाजपने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक केली असल्याचेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले आहे याची माहिती घ्या, त्यांचे धागेदोरे नागपूरच्या कोणत्या नेत्यापर्यंत आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठा आरक्षणाच्या विरोधात नेमकं कोण आहे असेही त्यांनी म्हटले. 

अजित पवार यांनी काय म्हटलं होतं?

मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget