(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Omicron Cases: राज्यात आज ओमायक्रॉनच्या 76 रुग्णांची नोंद, पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले
Maharashtra Omicron Cases:राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3531 रुग्णांची नोंद झाली आहे तर 2353 रुग्ण बरे झाले आहेत.
Maharashtra Omicron Cases: राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 76 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3531 रुग्णांची नोंद झाली आहे तर 2353 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 8568 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 7262 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 1306 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यात आज पुणे शहरामध्ये सर्वाधिक म्हणजे 46 रुग्णांची नोंद झाली आहे. तर अमरावती जिल्ह्यात 12, जालना 8, पुणे ग्रामीण क्षेत्रात 4, वर्ध्यामध्ये 3 रुग्णांची भर पडली आहे. सिंधुदुर्ग आणि अहमदनगर या जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 14 हजार 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha