(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील दहा मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Uddhav Thackeray Speech 10 points : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील दहा मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on Raj Thackeray : मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Uddhav Thackeray on Fadnavis : तुमच्या वजनाने बाबरी पडली असती : उद्धव ठाकरे
देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती
Uddhav Thackeray on Marathi Bhasha : छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत : उद्धव ठाकरे
छत्रपतींच्या मातृभाषेस अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकत नाहीत, असे करंटे सरकार तिथे बसलं आहे. पुरातत्व खात तेच जे औरंगजेबाची कबर राखतं, तिथे कबर राखतात आणि मंदीरांच्या जीर्णोद्धारास नकार देतात. देवेंद्रजी तिकडे जाऊन विरोध करा, असे अनेक प्रकल्प आहेत जिथे केंद्राने अडवणूक केली आहे.
कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Hindutva : हनुमान चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही उघडपणे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेसोबत गेलो.
मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत : उद्धव ठाकरे
हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे, हे सिद्ध करण्याची आम्हांला गरज नाही. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत : उद्धव ठाकरे
शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींचा आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल
गेल्या 25 वर्षात आम्ही देखील सडलो. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहे. सामनात जे छापून येते ते जनतेच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे असते. भाजप जी भाषा वापरते तसं आम्ही बोलत नाही. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते आमच्या नाही. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींची का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता : उद्धव ठाकरे
संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी? स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नाहीत. संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ... तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे.
दाऊद गुणाचा पुतळा आहे. : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Dawood : जर दाऊद बोलला की भाजप मध्ये येतो, तर त्याला मंत्री देखील करतील. नंतर म्हणतील, तस काही नाही हो, दाऊद गुणाचा पुतळा आहे. : उद्धव ठाकरे
आमच हिंदुत्व चूल पेटवणारं : उद्धव ठाकरे
श्रीलंका परत का पेटली याचा विचार करा. मध्ये कोणी तरी सांगितलं, मोदीजींनी धान्य फुकट दिलं. अरे कच्च खाणार का? ते शिजवायच कसं? गॅसच्या किंमती पहा. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणार नाही, अख्ख घर पेटलं तरी चूल पेटत नाही, आमच हिंदुत्व चूल पेटवणारं आहे. रोजगारीची आकडेवारी पाह. देवळं भोंगे इ. गोष्टी आहे परंतु लोकांच्या जेवणाची सोय कोण करणार? काम द्या, अन्यथा हातात धोंडे द्याल तर उद्या तीच धोंडे ते तुमच्यावर फेकून मारल्याशिवाय राहणार नाही. : उद्धव ठाकरे
हनुमानाचा, देवतांचा अपमान करू नका, ते हृदयात असावं : उद्धव ठाकरे
हनुमानाचा, देवतांचा अपमान करू नका, ते हृदयात असावं लागतं. स्त्रोत्र, प्रार्थना आम्हीं लहानपणापासून शिकलो आहोत. अगदी अर्जुनाच्या दुर्गास्त्रोत्रापासुन येतं. ही सभा नाही तर हा एक हिंदुत्वाचा उत्सवच आहे. राम हा हृदयात असावा : उद्धव ठाकरे
गलिच्छ विकृत राजकारण बंद करा : उद्धव ठाकरे
महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. समोरुन वार करा परंतु खोटीनाटी गलिच्छ विकृत राजकारण बंद करा. आता तरी सुधरा : उद्धव ठाकरे
संबंधित बातम्या :
भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची यांची तोफ धडाडली