निकालानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण...
Maharashtra HSC Result : बारावीच्या निकालानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अभिनंदन केलं आहे.

Maharashtra HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. या निकालानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ12) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करते, असं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे,असे आवाहन करते. परीक्षेत पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई, कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या 9 मंडळांमधून एकूण 1356604 विद्यार्थी (94.22%) उत्तीर्ण झाले, त्या सर्वांचे अभिनंदन करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रिय विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो,
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 8, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन! pic.twitter.com/kdND3jFoPi
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विशेषतःयंदाचा निकाल हा फेब्रुवारी-मार्च 2020च्या तुलनेत 3.56% वाढला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही अनेक आव्हानाला सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वीपणे लावल्याबद्दल राज्य मंडळाचे आणि माझ्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केला.पण विद्यार्थ्यांच्या,शाळांच्या व मंडळाच्या निर्धारामुळे परिक्षा यशस्वीरित्या पार पडल्या.सर्वांचे आभार.सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के
राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
कसा चेक कराल आपला निकाल
स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकतो. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
