Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 2369 नव्या रुग्णांची नोंद तर 1062 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला
मुंबई : राज्यात आज 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे.
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,91,555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 25,570 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 25,570 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 12,479 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5871 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 17 हजार 73 नवीन कोरोनाबाधित, 21 रुग्णांचा मृत्यू
रविवारी दिवसभरात देशात 17,073 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात पाच लाखआंहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी करण्यात यश आलं असलं, तरीही अद्याप कोरोना विषाणूच्या संसर्गावर पूर्णपणे मात करता आलेली नाही. देशात सध्या 94 हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 27 लाख 87 हजार 606 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आठवड्यातील रुग्णांचा सकारात्मकता दर 3.39 टक्के आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.