(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 2759 वर, सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात
Coronavirus Updates : राज्यात आज कोरोनाच्या 477 नव्या रुग्णांची नोंद झाली असून चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update) काहीशी स्थिर असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात 477 नवीन रुग्णांची भर पडली असून 319 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज राज्यात चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या (Coronavirus) 2759 वर पोहोचली असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये आहे. राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक म्हणजे 1093 सक्रिय रुग्णसंख्या असून त्या खालोखाल पुण्यात 564 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आढळली आहे. ठाणे शहरात 443 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आज 477 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 81,26,797 इतकी झाली आहे.
राज्यात आज 319 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 79,75,665 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.14 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत 8,50,37,528 इतक्या तपासण्या झाल्या असून 81,26,797 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 678 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,594 रुग्ण गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना सकारात्मक दर 1.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 1.05 टक्के इतका आहे.
देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 23 हजार 997 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 28 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरणात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.
Single-day rise of 2,678 new COVID-19 cases push India's infection tally to 4,46,23,997, death toll climbs to 5,28,857: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2022
ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटने धोका वाढवला
शास्त्रज्ञांना कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या संसर्गजन्य प्रकाराने नवे व्हेरियंट सापडले आहेत. चीनमध्ये शास्त्रज्ञांना ओमायक्रॉन दोन नवीन सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे दोन्ही सबव्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे.