![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
Maharashtra Budget : मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis : राज्यातील अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात वाढ करुन ते 10000 रुपये करण्यात आले आहे.
![Maharashtra Budget : मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा Maharashtra budget 2023 Devendra Fadnavis on Lek Ladaki Scheme 5000 for girl child birth 75000 for girl budget marathi news Maharashtra Budget : मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/09/1645c7bac060ba1b3cd1680cfba14b0f167835321369389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Budget 2023: राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात मांडण्यात आली असून त्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. मुलगी सज्ञान झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्याचं स्वागत केलं.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
- मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)