Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र पर्यटकांचा जीव घेणारे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. तसेच गद्दार हेर ज्योती मल्होत्राला आज हिस्सार जिल्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योतीवर आरोप आहे. तसेच राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणेसह कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी विविध अपडेट्स येत आहे. या महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, पावसाचे तीव्र इशारे कुठे कुठे?
फ्लॅश
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि २३ मे २०२५ च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता आहे
पुढील ६-७ दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२२ ते २४ मे २०२५ रोजी कोकण आणि गोव्यात आणि २४ मे २०२५ रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे
पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल
२२ ते २६ मे २०२५ रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती
२२ आणि २३ मे २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
तीन दिवसांनंतरही आग शमेना, पुणे, ठाण्यातून अग्नीशमन दलाच्या टीम आल्या, नाशिक जिंदल आगीबाबत काय अपडेट?
*21 तारखेला रात्री 2 च्या सुमारास आग लागली *
नाशिक मनपाचे अग्निशमन दल सुरवातीला दाखल झाले
पॉलिफिल्म बनवते त्यासाठी लागणार कच्चा माल अत्यंत जवलनशील आहे
त्याची आग लिक्विड होऊन पसरते
पाण्याने आग विझत नाही फोम त्यासाठी लागतो
पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या टीम आली आहे
जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहोत
एक्सपर्ट लोक येत आहेत प्रोपेन टॅंक आहे त्यात लिक्विड गॅस आहे
तो टॅंक फिक्स आहे, हलविता येत नाही*
तो 50 ते 60 मीटर दूर आहे
तिथे हवा नसल्याने नुकसान नाही
लोकांचा जीव वाचविणे ही आमची प्राथमिकता आहे
टँकच्या बाजूला धरणातील गाळ टाकून थंडावा निर्माण केला जात आहे
जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 1किलोमीटरवर काळजी घेतली जात आहे
जरी टॅंक ला आग लागली तरी सेफ्टी वॉल आहेत त्यामुळे टॅंक फूटण्याची शक्यता कमी आहे, जरी तसे झाले तरीही त्याची तीव्रता कमी करू
एकदा स्फोट झाला तर त्याच्या धमाका मुळे घराच्या काचा फुटू शकतात लोकांना इजा पोहचू शकते म्हणून लोकना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे
आग विझविण्यासाठी कोणत्याच साधनांची कमतरता नाही, इतर जिल्ह्यातून चांगले सहकार्य मिळत आहे























