Ajit Pawar: कार्यकर्त्याची मर्जी राखण्यासाठी अजित पवार थेट झेरॉक्स दुकानात, वाचा नेमकं काय झालं?
अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने (Tea Stall Owner) एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण केली.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले. बारामती (Baramati) दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने (Xerox Shop Owner) एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण केली.
झालं असं की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा होता. या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर दौऱ्यावर असताना त्यांनी बारामतीत नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ध्वज वंदन केले. एका कार्यकर्त्याने झेरॉक्सच्या दुकान सुरू केले. सुहास मढवी असे दुकानदाराचे नाव आहे. त्या दुकानाचे उद्घाटन अजित दादांनी करावे, असा मानस त्याचा होता. त्याने दादांना विनंती केल्यानंतर दादांनी कुठलेही आढेवेढे न घेता या कार्यकर्त्यांच्या छोट्याशा दुकानाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले. यावेळी दादांनी झेरॉक्स कशी काढतात हे देखील शिकून घेतले. तसेच त्याला त्याच्या दुकानासाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी देखील केली. अजित पवार यांनी बारामती येथील प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण केलं त्यानंतर प्रशासनात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. अजित पवार म्हणाले, मी जर बटन दाबून दुकानदाराचे समाधान होत असेल तर कशाला त्याला नाराज करायचे? म्हणून Xexox दुकानाला भेट दिली.
झेरॉक्स दुकान चालकाच्या चेह-यावर स्पष्टपणे आनंद दिसत होता
बारामतीत वेडे वाकडे प्रकार मी खपवून घेणार नाही. माझ्या जवळचा जरी वेडा वाकडा वागत असेल तर हायगय करू नका, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत. सगळ्यांना नियम सारखे आहेत अजित पवारांचे कुटुंब असले तरी त्यांना देखील नियम सारखेच आहेत, असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही, ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात व कार्यकर्त्यांचे मनही राखतात याचे प्रत्यय अनेकदा आला आहे. या घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला. आपल्या दुकानाचे उद्घाटन स्वत: अजित पवार यांनी केल्याचा आनंद झेरॉक्स दुकान चालकाच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा अशा सदिच्छाही जाता जाता पवार यांनी त्याला दिल्या.
संबंधित बातम्या :
Ajit Pawar On Gautami Patil : गौतमी पाटीलचा बैलासमोरचा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल; अजित पवार म्हणतात...