एक्स्प्लोर

Marathwada Flood 2025: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर सरसावलं, जिल्हा आपत्ती व्यवस्थान, व्हाईट आर्मी पोहोचली; सतेज पाटलांकडून मदतीचं आवाहन

महापुराची वेदना पाहिलेल्या कोल्हापूरनं मदतीसाठी हात पुढे केला आहे. व्हाईट आर्मीची तुकडी मदतीसाठी सोलापुरात दाखल झाली आहे. दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा सोलापूर जिल्ह्यात पोहोचलं आहे.

Marathwada Flood 2025: वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटंकती करणाऱ्या मराठवाडा विभागात (Marathwada Flood 2025) झालेल्या विनाशकारी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. अहिल्यानगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार केला आहे. शेती, घरं, रस्ते, पाणीपुरवठा योजना आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची पीकं पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर मोठा फटका बसला आहे, तर पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि मका या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभा राहिलं आहे. 

कोल्हापूरकडून मदतीचा हात 

दरम्यान, महापुराची वेदना 2005 मध्ये तसेच 2019 आणि 2021 असा तीन वर्षात दोनदा महापूर पाहिलेल्या कोल्हापूरनं मदतीसाठी पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. व्हाईट आर्मीची तुकडी मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. मध्यरात्री उत्तर सोलापूर, माढा तालुक्यातील गावामध्ये कोल्हापूरच्या जवानांनी 180 हून अधिक जणांची सूटका केली. दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा सोलापूर जिल्ह्यात पोहोचलं आहे. कोल्हापूरच्या जवानांनी शिंगेवाडी (ता. माढा जि. सोलापूर) या गावामधील पुराचे पाण्यात अडकलेल्या 25 नागरिकांची सुखरूप सुटका केली. द्रौपदी लक्ष्मण शिंदे, (वय 64) या लकवा असलेल्या महिलेला सुद्धा सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं आहे.

सतेज पाटलांकडून मदतीसाठी आवाहन 

दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनीही कोल्हापूर महापुराचा अनुभव सांगत मदतीसाठी आवाहन केलं आहे. सतेज पाटील यांनी सोशल मीडियातून मराठवाड्यासाठी मदतीचं आवाहनं केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. कोल्हापूरकरांनो, आपणही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. आज आपली वेळ आहे, ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया! आपली मदत आज 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत जमा करा. 29 तारखेला मदतीचा ट्रक मराठवाड्याकडे रवाना होईल, 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime : अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल; QRT च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडली
अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल; QRT च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडली
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचा महिला अध्यक्षपदाचाही राजीनामा घेणचं योग्य; सुनेत्रा पवारांपुढे राष्ट्रवादीचे आमदार मनातलं सगळं बोलले!
रुपाली चाकणकरांचा महिला अध्यक्षपदाचाही राजीनामा घेणचं योग्य; सुनेत्रा पवारांपुढे राष्ट्रवादीचे आमदार मनातलं सगळं बोलले!
Sheetal Mhatre On Ashok Kharat Case मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!
मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!

व्हिडीओ

Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
Rajiv Gandhi Zoological Park : पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
Dr. Jaysingrao Pawar : आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
डॉ. जयसिंगराव पवार: आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
Bhide Guruji on Ashok Kharat: अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
Ashok Kharat: भोंदू खरातचे 'गन कनेक्शन' उघड! जिल्हा प्रशासनानेच दिला होता शस्त्र परवाना; 21 काडतुसे जप्त, 5 काडतुसे वापरली, मोठी माहिती समोर
भोंदू खरातचे 'गन कनेक्शन' उघड! जिल्हा प्रशासनानेच दिला होता शस्त्र परवाना; 21 काडतुसे जप्त, 5 काडतुसे वापरली, मोठी माहिती समोर
Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
Ashok Kharat: हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका, यामध्ये नकारात्मक ऊर्जा ; खरातची विकृत खेळी, पुरातन शिवमंदिर पाडण्याचा डाव, एका ॲपचा वापर करत म्हणाला....
हे मंदिरच इथे ठेवू नका, हे पाडून टाका, यामध्ये नकारात्मक ऊर्जा ; खरातची विकृत खेळी, पुरातन शिवमंदिर पाडण्याचा डाव, एका ॲपचा वापर करत म्हणाला....
Embed widget