Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी; 475 गावांना थेट जनतेतून 'कारभारी' मिळणार
कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष रणधुमाळी उद्या सोमवारपासून सुरु होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच राज्यभरातील 7 हजारांवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष रणधुमाळी उद्या सोमवारपासून सुरु होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच राज्यभरातील 7 हजारांवर थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. याच निवडणूकीतून येणाऱ्या विधानसभेसाठी गटतट निश्चित होणार असल्याने राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागली आहे. ग्रामपंचायती स्थनिक पातळीवर लढवल्या जात असल्या, तरी होणाऱ्या आघाड्या नेत्यांच्या मार्गदर्शनात होत असल्याने त्याला अधिक महत्व आहे. सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची परीक्षा असणार आहे.
उद्यापासून प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुकानिहाय तहसिलदारांकडून अधिसूचना 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात होईल. सरपंच पदासह प्रभागनिहाय आरक्षण निश्चित असल्याने त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांकडून यापूर्वीच तयारी सुरु केली आहे. कोल्हापूर शहरालगतच्या गावांमध्येही निवडणूक होत असल्याने मोठी चुरस आहे. अनेक मोठ्या गावांमध्येही रणधुमाळी असल्याने विधानसभेची तयारी व्हावी, यासाठी आमदार, माजी आमदारही तयारीला लागले आहेत.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. प्रत्येक केंद्रावर सहा अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. 475 गावांतील 1977 मतदान केंद्रावर 18 डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी 1977 मतदान केंद्रावर तेवढीच मतदान यंत्रांची आवश्यकता असेल. ईव्हीएम चाचणी व सुस्थितीत ठेवण्याचे काम सुरू आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्रे
- करवीर 289
- राधानगरी 237
- पन्हाळा 186
- शाहूवाडी 165
- गगनबावडा 68
- कागल 105
- शिरोळ 104
- गडहिंग्लज 132
- चंदगड 126
- आजरा 118
- भुदरगड 136
निवडणुका होणाऱ्या गावांची संख्या
- करवीर 53
- कागल 26
- पन्हाळा 50
- शाहूवाडी 49
- हातकणंगले 39
- शिरोळ 17
- राधानगरी 66
- गगनबावडा 21
- गडहिंग्लज 34
- आजरा 36
- भुदरगड 44
- चंदगड 40
निवडणूक कार्यक्रम
- 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे
- 5 डिसेंबर - अर्जांची छाननी
- 7 डिसेंबर- चिन्ह वाटप
- 18 डिसेंबर - मतदान
- 20 डिसेबर - मतमोजणी
इतर महत्वाच्या बातम्या