Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला
Kolhapur : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.
![Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला Kolhapur By Election News Update Karuna Sharma Munde Will contest the election Satyajit kadam is BJP Candidate Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/be1f9a038b70d4af5c693fdd59afddac_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्याचे (Kolhapur News) लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.
धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील. करुणा शर्मा यांनीच हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर मंथन झालं आणि अखेरीस करुणा शर्मा यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्यानं करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाचीही चर्चा होत आहे.
भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव जवळपास निश्चित
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित (नाना) कदम यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या दहा वर्षापासून नाना कदम हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. 2014 सत्यजित (नाना) कदम यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. सत्यजित (नाना) कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत.
सगळ्याच पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, मात्र सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले होते. मात्र आमदारकी मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तशा पद्धतीने तयारी देखील सुरु आहे
संबंधित बातम्या
Election : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)