एक्स्प्लोर

Election : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता त्या ठिकाणी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

Kolhapur Election : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाबरोबर देशातील पाच विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. शिवसेनेच्या आमदाराचा पराभव करून चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला. या रिक्त जागी सुरुवातीला बिनविरोध निवडणूक होईल असं वाटलं होतं...मात्र आता सर्वच पक्षांची तयारी पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल याची शक्यता कमी आहे...

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा याठिकाणी विद्यमान आमदार होते. त्या ठिकाणी पुन्हा काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार. पण शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसने केला होता. त्यामुळे आता शिवसेना भूमिका काय घेणार हे पहावं लागणार आहे. कारण माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील पक्ष आदेश देईल तशी भूमिका घेण्याचं बोलून दाखवलं आहे. भाजपने देखील आपल्या उमेदवाराची तयारी सुरू केली असून लवकरच ते उमेदवाराचे नाव घोषित करण्याची शक्यता आहे. 

जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला
चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढावी अशी इच्छा चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी भाजपकडून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना जर रिंगणात उतरणार असेल तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊ शकते. 

पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 17 मार्च
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 मार्च
  • अर्जांची छाननी 25 मार्च
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च
  • मतदान 12 एप्रिल आणि मतमोजणी 16 एप्रिलला होणार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget