एक्स्प्लोर

तुम्ही घेतलेला आंबा खरा देवगड हापूसच आहे का? या टेक्नॉलॉजीच्या मदतीने क्षणार्धात ओळखता येणार, वाचा सविस्तर

देवगडचा हापूसला जगभरात सर्वोत्कृष्ट आंब्याचा दर्जा दिला जातो .आंब्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवगडच्या हापूसला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भौगोलिक मानांकनाचा दर्जाही आहे .

Devgad Alphanso: देवगड हापूसची रसाळ चव चाखण्यासाठी आंबा प्रेमींची आतुरता शिगेला पोहोचली आहे .बाजारपेठेत आता आंबे येऊ लागले आहेत .नुकतेच साताऱ्यातील देवगड हापूसच्या पहिल्या मानाच्या पेटीला 20 हजारांची बोली लागली . पातळ सालीचा आणि आत भरपूर गर असणारा देवगड हापूस जाणकाराला नुसत्या सुवासाने  ओळखता येतो .मात्र देवगड हापूस खरेदी करताना अनेकदा हा आंबा नक्की देवगडचा हापूसच आहे का ? की त्या नावाखाली दुसराच हापूस दिलाय ? हे न ओळखता आल्याने अनेकांची फसवणूक होते . मात्र आता ही फसवणूक रोखण्यासाठी आता एका टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय . या टेक्नॉलॉजीने नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणे सोपे होणार आहे . 

देवगडचा हापूसला जगभरात सर्वोत्कृष्ट आंब्याचा दर्जा दिला जातो .आंब्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवगडच्या हापूसला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भौगोलिक मानांकनाचा दर्जाही आहे .या टेक्नॉलॉजीने आंब्यावर लावल्या गेलेल्या TP seal UID कोड वरून खरा देवगड हापूस ओळखता येणार आहे .विशेष म्हणजे जीआय नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे .

TP Seal UID टेक्नॉलॉजी नक्की काय ?

देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक सहकारी संस्थेने भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID या तंत्रज्ञानात चे वितरण केले आहे .यात शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल .

प्रत्येक स्टिकर दोन भागात विभागलेला असून एक स्वतंत्र यूआयडी असतो .त्या कोडचा एक भाग स्टिकरच्या वरती आणि दुसरा भाग स्टिकरच्या खाली असतो .

खरा देवगड हापूस कसा ओळखायचा ?

या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण खरेदी करत असलेला आंबा देवगड हापूसच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी + 9167 668 899 या क्रमांकावर व्हाट्सअप च्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे .

ही सिस्टीम त्या स्टिकर वरील कोड वाचते आणि स्टिकर च्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते .

नंबर वाचण्यासाठी स्टिकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात .

जर व्हाट्सअप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टीम मधील UIDशी जुळला तर ग्राहकास शेतकरी /विक्रेत्याचे नाव ,मुळगाव , GI नोंदणी क्रमांक असा तपशील पाठवला जातो .

या तपशिला वरून पडताळणी केली असता देवगड हापूस बाबतची विश्वसनीयता वाढेल असे सांगण्यात येत आहे .

हेही वाचा:

देवगड हापूसच्या पहिल्या मानाच्या पेटीची बोली लागली; साताऱ्यात व्यापाऱ्यांनी फटाके फोडत केला जल्लोष, किती भाव मिळाला?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget