(Source: ECI/ABP News/ABP Majha)
E-Vehicle : 'ई वाहनं' क्रांती घडवणार? आज एबीपी माझावर दिग्गजांचं मंथन
E-Vehicle : ई-वाहनं क्रांती घडवणार का? हा प्रश्न काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आता बऱ्यापैकी सर्वसामान्य झाल्या आहेत.
E-Vehicle : सध्या भारतीय बाजारात ई-वाहनांचा बोलबाला आहे. तसेच ई वाहनांबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळत आहे. अनेक मोठ्या दुचाकी आणि चारचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची ई वाहनं बाजारातही आणली आहेत. पण या ई वाहनांबद्दल ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्या पर्यावरपूरक आहेत पण मोठ्या प्रवासात काय? चार्जिंगची सोय काय? सध्या गाड्यांच्या किमतीही अधिक आहेत. मग कशी विकत घ्यायची ही गाडी अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमातून मिळणार आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने या वाहनांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ईव्हीची पॉलिसी देखील तयार केली आहे. त्याबद्दलही तज्ञ बोलतील. या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) दोघेही सहभागी होतील. तसंच राज्याचे अतिरिक्त सचिव आशिषकुमार सिंग ईव्ही पॉलिसीबद्दल सांगतील. टाटाचे वरिष्ठ अधिकारी निखील देशपांडे, ई वाहनांची निर्मिती करणारे गणेश निबे, पर्यावरण तज्ञ किशोर धारिया आणि ऑटोमोबाईल एक्सपर्ट दिलीप देसाई हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.
ई-वाहनं क्रांती घडवणार का? हा प्रश्न काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आता बऱ्यापैकी सर्वसामान्य झाल्या आहेत. सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनं ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी आणि सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे. त्यामुळे निर्माते आणि आपल्यासारखे लोक इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांकडे वळण घेत मोठी भूमिका बजावू शकतात.
ज्यामध्ये ई वाहनांचे फायदे आणि तोटे काय? या ई-वाहनांमध्ये कार, बाईक वेगळी कशी आहे? देखभाल खर्च कसा आणि किती? चार्जिंग स्टेशन्सचं काय? नैसर्गिक संसाधनांची बचत, सबसिडीचे फायदे काय? निर्मिती क्षेत्रात असणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्यांसाठी ही गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी कशी आहे? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच्या एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होऊन आपली मतं मांडणार आहेत.
चर्चेसाठी उपस्थित राहणारे दिग्गज :
पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे
उद्योगमंत्री सुभाष देसाई
आशिषकुमार सिंह, अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र
निखिल देशपांडे, टाटाचे सिनियर जनरल मॅनेजर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ई-व्हेईकल
गणेश निबे, निबे मोटर्सचे सर्वेसर्वा
किशोर धारिया, पर्यावरतज्ज्ञ
दिलीप देसाई, ऑटो एक्स्पर्ट
कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी दुपारी 3 वाजता एबीपी माझा लाईव्ह पाहा