एक्स्प्लोर

Raju Shetti on Devendra Fadnavis: काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात, तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शाहांमध्येही कारवाईची धमक नाही; राजू शेट्टींचा घणाघाती प्रहार

Raju Shetti on Devendra Fadnavis: सीएम फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांची यादी जाहीर करणार असल्याचा इशारा दिला. शेट्टी यांनी प्रतिआव्हान देत ती यादी तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

Raju Shetti on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (5 ऑक्टोबर) लोणीमधील शेतकरी मेळाव्यातून राज्यामध्ये काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांची मी यादी केली असून त्यांना लवकरच दाखवतो असा गर्भित इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस (Raju Shetti on Devendra Fadnavis) यांना प्रतिआव्हान देत कारवाई करणारच आहात तर, काटामारी करणारे शोधून काढलाच आहात तर तुमचे जे दाखवायचं ते एकदा दाखवा पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा, असं आव्हान दिलं आहे. 

 

अमित शाह यांच्यात देखील धमक नाही (Raju Shetti on Amit Shah Sugar Factory Scam) 

राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत हल्लाबोल केला. राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात. तुम्हीच काय तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केलं त्या तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरूष समजल्या जाणाऱ्या अमित शाह यांच्यात देखील काटामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमक नाही. तरीही काटा मारणारे शोधूनच काढला आहात, तर तुमच जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा पण ती यादी तेवढी लवकर जाहीर करा, असे आव्हान दिलं आहे. 

कारखान्याचे मालक आमचा शेतकरी (Sugarcane Farmers Maharashtra)

दरम्यान, काल झालेल्या मेळाव्यात फडणवीस म्हणाले होते की, अरे तुम्ही मालक नाही या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल. साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याबद्दल ते म्हणाले की, बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता, तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे. एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले. 

काटा मारून कारखानदार पैसे कमवतात (Devendra Fadnavis on Sugar Factory Scam)

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचा काटा मारून (वजनामध्ये फसवणूक) कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही, जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा.  आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget