एक्स्प्लोर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ कार्यालयाला भेट; पंधरा दिवसातली दुसरी भेट, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची संघाशी खलबतं?

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संघ कार्यालयाला आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur News नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील  (Nagpur News) रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarter) आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली ही सलग दुसरी फडणवीसांची  भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असताना भेटीला विशेष महत्त्व  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या नागपूर येथील संघ कार्यालयात नसल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थित देवेंद्र फडणवीस हे संघातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. साधारणतः अर्धा तासाच्या या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची  शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर  राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चांगलेच सक्रिय झाले असून सध्या घडीला त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. या एकंदरीत भेटी संदर्भात देवेंद्र फडणवीस हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी निवडणूक आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावासंदर्भात या भेटीला फार महत्त्व प्राप्त झाल्याचे देखील बोलले जात आहे.

 राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची राजकीय खलबतं? 

सध्या घडीला राज्याचे राजकारण विविध मुद्द्यांनी अक्षरशः ढवळून निघाले आहेत. त्यात आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्द्यावरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असेल, तसेच गेल्या लोकसभेच्या निकालानंतर  भाजपची झालेली काहीशी पिछाडी लक्षात घेता, संघाची भूमिका येणाऱ्या निवडणुकांसाठी लक्षात घेणे हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या अनुषंगाने पडद्यामागे काहीतरी  खलबतं होत आहेत का, अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यात राहून इथल्या राजकीय परिस्थितीवर  भाजप आणि महायुतीला विजय संपादन करून देतील, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.  विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे देखील बोलले जात आहे. मात्र यात नेमकी भाजपची भूमिका  काय आणि पडद्यामागे काय राजकारण शिजतंय, हे अद्याप तरी स्पष्ट नसले तरी संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेली देवेंद्र फडणवीस यांची भेट  विविध अंगाने महत्त्वाची मानली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget