(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Strike : मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या दौऱ्यावर आहेत. शेगाव येथून खामगावकडे येत असताना त्यांनी रस्त्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली.
बुलडाणा : "मी खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन (ST Strike) इतके दिवस चाललं नसतं" असे भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.
नाना पटोले हे आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या दौऱ्यावर आहेत. शेगाव येथून खामगावकडे येत असताना त्यांनी रस्त्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन दिले. यावेळी पटोले यांनी आपण खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन एवढे दिवस चालले नसते असे कर्मचाऱ्यांना सांगितले. यावर कर्मचाऱ्यांनीही पटोले यांना प्रतिप्रश्न केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिल्याचे पाहायला मिळाले.
"आता ही आपण सत्तेत आहात आपण करू शकता" असा प्रतिप्रश्न कर्मचाऱ्यांनी पटोले यांनी केला. यावर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, "आम्ही सत्तेत असलो तरी आमची सत्तेतील आस का आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे? यावरुन काँग्रेस नेमकी सत्तेत कशासाठी आहे?, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पटोले यांना कळले की नाही? नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं? यावर एसटी कर्मचारी संभ्रमात पडले.
दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यांनी हा संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारने त्यांना वेळ दिली होती. ती वेळ गुरुवारी संपली असून शुक्रवारपासून कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास एसटी महामंडळाने सुरूवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात नकार
- ST Strike : कामगार संघटनेकडून संपातून माघारीबाबत अधिकृत माहिती नाही, एसटी महामंडळाची मुंबई उच्च न्यायालयात कबूली
- संप मागे घेतला नाही तर; तर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ST Workers Strike : रुजू झालेल्या दिवशी बडतर्फी आणि निलंबन मागे घेणार : अनिल परब