Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हेच औरंगजेबासारखे वागत आहे; भाजप प्रदेशाध्यक्षाचा पलटवार, म्हणाले...
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हे औरंगजेबासारखेच वागत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Chandrashekhar Bawankule वर्धा : उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हे औरंगजेबासारखेच वागत आहेत. अमित भाईंची (Amit Shah) उद्धव ठाकरे काय बरोबरी करू शकतात, असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील तर त्यांना नक्कीच याचे दु:ख होत असेल. उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचे स्वरूप स्वकीरले असल्याची बोचरी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते वर्धा येथे बोलत होते.
अमित शाहांनी बाळासाहेबांचे स्वप्न खऱ्याअर्थाने पूर्ण केलं- चंद्रशेखर बावनकुळे
ज्या अमित शाहांनी कलम 370 रद्द केलं. त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत आहेत. ज्या अमित भाईंनी काँग्रेसनी तयार केलेलं 370 कलम हे देशावरील एक कलंक रद्द करून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं, त्या अमित शाहची तुम्ही काय बरोबरी करणार? काश्मीर ते कन्याकुमारी भरात एकसंघ करण्याचं काम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलंय. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात त्यांनी पूर्ण केलंय. मात्र राजकारणाकरिता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे की तुम्हाला आता जनताच योग्य तो धडा शिकवेल. असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
जनता तुम्हाला आता खरा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे
अशा खालच्या पद्धतीचे बोलने, घाणेरड्या पद्धतीचे वक्तव्य करणे, कधी देवेंद्रजी बद्दल बोलने, कधी अमित भाई बद्दल बोलने, हे महाराष्ट्राच्या जनता खपवून घेणार नाही. हिंदू म्हणजे हिंसा असे म्हणणारे राहुल गांधी त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसले आहात आणि ते आता हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत, मात्र जनता तुम्हाला खरा जाब विचारल्याशिवाय राहणार नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत, असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते फार फ्रस्टेट झाले आहेत. या अस्वस्थतेत ते असे शब्द वापरत आहेत. यावर आपण काय उत्तर द्यायला हवं. नैराश्यात एखादी व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं नसतं, असे फडणवीस म्हणाले.
तसेच, अमित शाह यांनी औरंगजेब फॅन क्लब असा शब्द वापरला होता. उद्धव ठाकरे यांनी हे भाषण करून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.
हे ही वाचा