फडणवीस साहेब तुमच्यामुळं आम्ही कडू गोळी गिळतोय, खासदार निंबाळकरांचा रामराजेंना टोला
दुष्काळ हटवणारे खरे नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच असल्याचे वक्तव्य भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी केलं.
Ranjit Naik Nimbalkar : दुष्काळ हटवणारे खरे नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच असल्याचे वक्तव्य भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी केलं. नीरा देवधरच्या पाण्याचा लाभ लाखो लोकांना होणार आहे. बारामतीकरांच्या हातात सत्ता होती. त्यांनी 23 वर्ष काम सुरू होऊ दिले नाही असे म्हणत निंबाळकरांनी शरद पवार यांना टोला लगावला. तर देवेंद्र फडणवीस साहेब आज तुमच्यामुळं आम्ही कडू गोळी गिळतो आहे असं म्हणत नाव न घेता निंबाळकरांनी रामराजे नाईक निंबाळकरांना टोला लगावला.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निरा देवधरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आलं. या कार्यक्रमात खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर बोलत होते. फलटणला कमिन्स आली पण आमच्या लोकांना काम मिळले नाही. आता नाईक बोंबवाडी येथील एमआयडीसी मुळे लोकांना रोजगार मिळेल असे निंबाळकर म्हणाले. तुम्ही फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग देखील मार्गी लावला. बंगळुरुला जाणारा कॉरिडॉर हा फलटण आणि माण मधून जाणार असल्याचे ते म्हणाले.
माळशिरसला पाणी कधी मिळणार?
यावेळी निंबाळकरांनी माळशिरसच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. माळशिरसला पाणी कधी मिळणार असे ते म्हणाले. या कामासाठी 850 कोटींची गरज आहे, आज आपण त्याची घोषणा करावी असे निंबाळकर म्हणाले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुसू शकत नाही. मी जे जे मागितले ते ते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे निंबाळकर म्हणाले. नीरा देवधरचा प्रश्न आला तेव्हा उदयनराजे भोसले यांनी मला राष्ट्रवादीत असून देखील त्यावेळी मला साथ दिली..तेच कारण असेल की त्यांनी राष्ट्रवादी सोडली असावी असेही निंबाळकर म्हणाले.
यावेळेस तुम्ही सांगेल त्याला आम्ही सहकार्य करु. फलटण तालुक्यातील जनता यावेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला 70 ते 80 हजार मताचे मताधिक्य देऊ असे आश्वासन रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिले. तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आज तुमच्यामुळे आम्ही आज कडू गोळी गिळत आहोत, असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनाही त्यांनी टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या: