kirit somaiya : डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार
छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी गेलो होतो, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचे सोमय्या म्हणाले.
kirit somaiya : माझ्याबरोबर सुमारे 20 ते 25 लोकांवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी आमची भूमिका मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी एफआयर आमच्या हातात दिली. ती एफआयर म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले. छगन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती पाहण्यासाठी गेलो होतो, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाला असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच मला देऊन टाका रोज माझ्या आईला संताप नको असे म्हणत सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.
बेनामी प्रॉपर्टीची पाहणी करणे हा गुन्हा आहे का?
भुजबळांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला की, मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकणार, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला हे समजत नसल्याचे सोमय्या म्हणाले. बेनामी प्रॉपर्टीची पाहणी करणे हा गुन्हा आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला. कोवीड सेंटरमध्ये घोटाळा करणारे संजय राऊत, त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. जे हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळले त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण 100 कोटींची प्राॉपर्टी मीडियाला, जगाला दाखवली म्हणून आमच्यावर कोरोना नियमांचा दुरुपयोग करुन गुन्हा दाखल करण्यात येतो, हे आमचं दुर्दैव असल्याचे सोमय्या म्हणाले.
महाराष्ट्र घोटाळामुक्त करुन दाखवणार
शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लुटणार आणि किरीट सोमय्या गप्प राहणार का? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकदा काय हजारवेळा मला जेलमध्ये टाकले तरी महाराष्ट्र घोटाळामुक्त करुन दाखवणार असेही सोमय्य यावेळी म्हणाले. मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते बघा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत, तेवढ्या एकदाच देऊन टाका रोज माझ्या आईला संताप नको असे सोमय्या यावेळी म्हणाले.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण सत्य असे आहे की, ते संपत्ती बघायला एकटे आले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही बाजूला पोलीस होते. हे पूर्ण राजकीय षडयंत्र असल्याची माहिती सोमय्या यांचे वकिल दिनानाथ तिवारी यांनी दिली. नोटीस पाठवली आहे. त्यांनी एफआयआर दाखल केला आहे, पण चार्जशीट अजून दाखल जाली नाही. कलम 188, सेक्शन 11, 41बी आणि इतर कलमं लावली असल्याची माहिती दिनानाथ तिवारी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: