एक्स्प्लोर

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा अटकेत, बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर आता अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. तर बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Amruta Fadnavis : महाराष्ट्रातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली. त्याबदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

अमृता फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर आता अनिक्षाला अटक करण्यात आलीय. बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला फसवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

काय म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी?

"अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तीवर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंघानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरुवात केली. या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. तसेच प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतले. या माध्यमातून त्या डिझायनर असलेल्या मुलीने विश्वास संपादन केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने येणं जाणं सुरु केलं. यातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे." असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

काय आहे प्रकरण?  

एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde : रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार, 'लाडक्या बहिणीला' सरकारकडून ओवाळणीZero Hour : नवनव्या योजनांचा महायुतीला  विधानसभेत फायदा होणार?Zero Hour : सरकारकडून योजनांचा पाऊस विरोधकांकडून टीकेची बरसातZero Hour : अजित पवारांना परत पक्षात घेणार?  शरद पवारांचं सूचक विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला
Kolhapur News : तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली
Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख
Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख
लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणीला गेल्या, चोरट्याने डाव साधला, 20 हजाराचं सोनं लंपास  
लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणीला गेल्या, चोरट्याने डाव साधला, 20 हजाराचं सोनं लंपास  
Embed widget