(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe : राष्ट्रवादीच्या फुटीपेक्षा खासदार अमोल कोल्हेंच्या भूमिकेचीच चर्चा; शेअर केलेल्या फोटोनं वेधलं लक्ष!
निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये एकमेव अमोल कोल्हे असे होते ज्यांनी दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
Amol Kolhe : राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने चर्चेत आहेत. निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये एकमेव अमोल कोल्हे असे होते ज्यांनी दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार !
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 7, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे गेल्या तीन दशकांपासून जनतेच्या मनावर कोरले गेलेलं समीकरण आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार" या नावामागे असलेला पुरोगामी विचार… pic.twitter.com/69jxGcLoRk
मात्र, आता त्यांनी भूमिका स्पष्ट करताना शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूने गेल्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून कडाडून प्रतिक्रिया आल्या. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांनी उशिरा ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास बराच वेळ दिल्यानंतर भूवया उंचावल्या होत्या. मात्र, उशिराने का होईना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार !
मात्र, शरद पवार गटाच्या पक्षाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत असलेला फोटो शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे गेल्या तीन दशकांपासून जनतेच्या मनावर कोरले गेलेलं समीकरण आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार" या नावामागे असलेला पुरोगामी विचार महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमाने संघर्ष करू, पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू! #आम्ही_पवारसाहेबांसोबत #SharadPawar #AmolKolhe
दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 6, 2024
कालही... आजही...!!!#Saheb #SharadPawar #AmolKolhe@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/W2RxC3TRnu
दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही. कालही… आजही…!!!
तत्पूर्वी, त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला व्हिडीओ एका प्रयोगातील असून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही. कालही… आजही…!!!’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला देत म्हटलं आहे की, “इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या सळसळत्या रक्ताचा हा अंगार या मनामनात धगधगता ठेवाल. कटकारस्थानं होतंच राहतील, या ना त्या मार्गाने विष प्रयोग होतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजीरुपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमन्यांमध्ये.”
इतर महत्वाच्या बातम्या